शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेंडखळेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

जंगलात सोडले : वन अधिकाऱ्यांनी वाचविले

राजापूर : भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. ही घटना पेंडखळे गावातील चिपटेवाडीत घडली. पेंडखळे चिपटेवाडीतील केशव सोनू कांबळे यांच्या घरानजीकच्या विहिरीत शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान हा बिबट्या पडला. ही बाब शनिवारी सकाळी लक्षात आली. आपल्या विहिरीतून काहीतरी जोरात आवाज येत असल्याचे कळताच कांबळे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या उड्या मारताना आढळला. सुमारे ६० फूट उंचीची ही विहीर असून त्यामध्ये आणखी एक छोटी पोटविहीर आहे. मुख्य विहिरीत पाणी नसल्याने बिबट्या तेथे उड्या मारत होता. गावचे पोलीसपाटील विजय चिपटे यांना ही खबर देण्यात आली. त्यानंतर पोलीसपाटलांनी वनविभागाचे वनपाल सुधाकर गुरव यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. थोड्या वेळातच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी समवेत आणलेला पिंजरा त्या विहिरीत सोडला व बिबट्याला आतमध्ये यशस्वीरीत्या बंदिस्त केले. नंतर त्या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली व तो सुरक्षित असल्याचे सांगितले. विहिरीत पडलेला बिबट्या हा सहा वर्ष वयाचा असून तो नर आहे. त्याची लांबी १८५ सें. मी. तर ३८ सें.मी. उंची आहे. दोन्ही पायाची नखे परिपक्व आहेत, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी चिपळूणचे विभागीय वन अधिकारी अमर साबळे, राजापूरचे वनपाल सुधाकर गुरव, रत्नागिरी परिक्षेत्राचे वनपाल स. म. गावकर, वनरक्षक सागर गोसावी, वनविभागाचे कर्मचारी विजय म्हादये, दीपक म्हादये, दीपक चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या बिबट्याला नंतर नेहमीप्रमाणे नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडण्यात आले. चालू वर्षात चार ते पाचवेळा असे प्रकार घडले असून, ओणीमध्ये एका विहिरीत तर ब्लॅक पँथर विहिरीत पडला होता. (प्रतिनिधी)