शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, बडा गम’

By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST

भातपीक हंगाम उरकला : उन्हाळी शेतीकामांना वेग; खळ्यावरील मळणी इतिहासजमा

सुरेश बागवे -- कडावल--परिसरात खरीप भातपिकाचा यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. पाऊस व सदृश वातावरणाने भातपिकाच्या अंतिम हंगामालाही शेतकऱ्यांसाठी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या भातपिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना ‘थोडी खुशी, बडा गम’चा अनुभव आला आहे. सध्यातरी भातकापणीचा हंगाम पूर्ण झाला असून उन्हाळी शेतीकामात शेतकरी गुंतला आहे. दरम्यान, यंदाही अनेक शेतकऱ्यांनी खळ्यावरच्या मळण्यांना ‘बगल’ दिली आहे.परिसरातील खरीप भातकापणीचे काम पूर्ण झाले आहे. भातकापणी संपल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी हा हंगाम शेतकऱ्यांसाठी विशेष सुखावह झाला नाही. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या प्रतिकूलतेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. भात लांबणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्यामुळे कामे बरेच दिवस खोळंबून राहिली. मधल्या काळात शेतीयोग्य पाऊस पडल्याने शेतकरी खुशीत होते. मात्र, नंतर भातकापणीवेळी पावसाने पुन्हा डोके वर काढले. सातत्याने काही दिवस पाऊस पडल्याने भातपिकाची मोठी हानी झाली. भाताबरोबरच सरलाही कुजून गेल्यामुळे पुढील काळात गुरांच्या वैरणीचीही चणचण भासणार आहे.निसर्गाच्या फटक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना यंदा भात बियाण्यांनीही दगा दिला. येथील शेतकऱ्यांनी यंदा सुधारित व संकरित भातबियाण्यांचा वापर पेरणीसाठी केला होता. यापैकी काही तुरळक बियाण्यांची उगवण योग्य प्रमाणात झाली नाही, तर काही संकरित बियाणी भेसळयुक्त सिद्ध झाली आहेत. पारंपरिक भाताच्या जातींसह एककाडीसारख्या काही संकरित वानांनी मात्र मदतीचा हात दिला आहे. एकंदरीत यंदाचा खरीप भात हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. दरम्यान, पाऊस व पाऊससदृश वातावरण असूनही त्यास हुलकावणी देऊन शेतकऱ्यांनी भातकापणी पूर्ण केली आहे. आता ते उन्हाळी शेतीसंबंधीच्या नियोजनात गुंतले आहेत. खळ्यावरील मळणी इतिहासजमा पूर्वी शेतकरी भातकापणी हंगामात दिवसभरात भातकापणी, खळवटणी करून रात्री उशिरापर्यंत भाताची झोडणी करत असत. गवत वाळवण्यासारखी इतरही बरीच कामे त्यांना दिवसा करावी लागायची. दिवसभराच्या श्रमाने अंग तिंबून गेल्यानंतरही भल्या पहाटे खळ्यावर मळण्या काढल्या जात. पहिला कोंबडा आरवला की, साधारण: चार वाजता मळणीला बैल जुंपले जात. शेतकऱ्यांचा दिवस तेव्हा पहाटे चार वाजता सुरू होत असे. खांब्याभोवती मळणीचे बैल फिरू लागले की, खळ्यावर चैतन्य पसरे. काहीवेळा शेतकरी आळीपाळीने एकमेकांच्या खळ्यावर मळण्या काढत असत. यासाठी मग पाहुणचाराचे बेत आखले जात. अस्सल गावठी कोंबडीच्या फक्कड रश्श्यासह वड्यांवर आडवातिडवा हात मारला जाई. आता मात्र मळणी इतिहासजमा होऊ लागली आहे. मळणीविना खळे सुनेसुने होऊ लागले आहे.