शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर

By admin | Updated: January 18, 2017 23:58 IST

विनायक राऊत : पहिल्या टप्प्यात ९0 टक्के उमेदवार; अखेरची यादी ३१ ला

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या ९० ते ९५ टक्के उमेदवारांची पहिली यादी सोमवारी (दि. २३) जाहीर करण्यात येणार आहे. उर्वरित काही जागांवर मातब्बर इच्छुक उमेदवार असल्याने त्यातून मार्ग काढून अखेरची यादी ३१ जानेवारीपूर्वी जाहीर केली जाणार आहे, अशी घोषणा खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.यावेळी शिवसेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन मुकादम, आमदार उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. राऊत म्हणाले की, शिवसेनेकडे यावेळी जिल्हाभरात उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची संख्या खूपच मोठी आहे. सर्वच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. निवडून येण्याची शक्यता किती आहे, याबाबत ग्रामपातळीवर शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख यांच्याशी चर्चा करूनच उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी व नऊ पंचायत समित्यांच्या ११० जागांसाठी येत्या २१ फेबु्रवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना स्वबळावर सत्तेत येण्यास सज्ज आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)आता युती अशक्य...रत्नागिरी नगरपरिषद पोटनिवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, नगरपरिषद निवडणुकीत युती झाली नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत युती होणे अशक्य आहे. शिवसेनेने स्वबळावर निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. एकहाती सत्तेच्या दिशेने सेनेची वाटचाल सुरू झाली आहे, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात राऊत म्हणाले. विमानतळ धावपट्टी, टर्मिनलसाठी जागा हवीरत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या विमानतळाचा विमान वाहतुकीसाठी वापर करण्याकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ व सर्व संबंधितांकडून परवानगी मिळाली आहे. आता धावपट्टीची पूर्तता होणे बाकी आहे. वाढीव धावपट्टीव टर्मिनलसाठी मिरजोळेच्या दिशेने आणखी १० एकर जागेची आवश्यकता आहे. कोणत्याही स्थितीत २०१७ मध्ये रत्नागिरीतून विमान वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे राऊत म्हणाले.