शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

औषधांच्या विक्रीसाठी जीवघेण्या कसरती

By admin | Updated: November 14, 2014 00:14 IST

पोटाच्या खळगीसाठी कायपण : ‘रियल हिरो’ने जिंकली वैभववाडीवासीयांची मने

वैभववाडी : आयुर्वेदिक औषधाची विक्री आणि त्याची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी जीवघेण्या कसरतींचे चित्र सुन्न करणारे आहे. त्या औषधाच्या वापराने आजार बरे होतात हे सांगतानाच स्टंट वाटाव्या अशा करामती दाखवून पोटाच्या खळगीसाठी ‘कायपण’ करण्याची तयारी करणारे कुटुंब पहायला मिळाले. त्यांचे औषध काही प्रमाणात खपले मात्र कसरतींनी मिळविलेले ‘दान’ पोटाची लाचारी दाखवून गेले.जेमतेम १० ते १५ मिलिच्या बाटलीतील ते औषध बहुगुणकारी असल्याचे सांगत कसरती करणाऱ्याने औषध दातांवर चोळून अनेकांना वाटाण्याच्या आकाराचे खडेही चावायला लावले. खडे दाताने फोडूनही वेदना होत नाही हीच खरी तर त्या औषधाची खरी सिद्धता होती. मात्र ती अधिक ठळकपणे पटविण्यासाठी त्याने अनेक जीवघेण्या कसरती केल्या. त्या खरोखरच सुन्न करणाऱ्या होत्या.त्या औषधाच्या वापराने दात मजबूत होतात हे सिद्ध करण्यासाठी लोखंडी नांगर दातांमध्ये स्थिर धरून चालणे, लाकडी ओंडका दाताने उचलून डोक्यावरून मागे टाकणे, अंगाला औषध चोळून सुमारे १५० ते २०० किलोचा दगड छातीवरून फिरवणे या कसरतीनंतर मनगटाला औषध चोळून मनगटाने एकजीव दगड फोडूनही दाखविला. त्यामध्ये औषधाच्या वापराप्रमाणेच त्यांची विशिष्ट कलाही होती. मात्र, पोटासाठी लोक काय करतात याची प्रचितीही यावेळी आली.औषध दिले जात होते १०० रुपयांना! मात्र जीवावर बेतणाऱ्या कसरती सादर केल्या त्या पोटाच्या खळगीसाठी कर्नाटक प्रांतातून आलेल्या त्या कुटुंबाला इकडच्या भाषेची जाण पुरेशी नसल्याने तीन-चार भाषांची ‘मिसळ’ करून ते विषयाची मांडणी करत होते. त्या अंगावर शहारे आणणाऱ्या कसरती पाहून काहींनी दहा, पाच रुपये दान दिले. मात्र रणरणत्या उन्हात त्यांच्या पोटाची आग शमविण्याएवढे नव्हते.एकेकाळच्या ‘इडीएट बॉक्स’ (टीव्ही) वरील जाहिराती पाहून सौंदर्य प्रसाधने, वेदनाशामक औषधे खरेदी करण्याची अनेकांना सवय झाली आहे. मदिरेचा व्यासंग जडलेल्यांना स्वत:चीही खात्री नाही अशा काही मंडळींनी चक्क त्या आयुर्वेदिक औषधाची ‘एक्स्पायरी’ विचारणे काहीसे विनोदी वाटणारे आणि खिल्ली उडविणारे होते. विविध उत्पादनांच्या नटनट्यांनी टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या काहीशा फसव्या जाहिराती प्रभावित करणाऱ्या ठरतात. मात्र, ‘रियल हिरो’च्या जीवघेण्या कसरतीनंतर एक्स्पायरी विचारणे आणि त्याला मिळालेली बक्षिसी विचार करायला लावणारी आहे. (प्रतिनिधी)