शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्रातील धडाडी राजकारणातही दिसू दे

By admin | Updated: June 21, 2016 01:18 IST

सर्वपक्षीय नेत्यांकडून गौरव : विकास सावंत यांच्यावर कौतुकांचा वर्षाव

सावंतवाडी : विकास सावंत यांनी सर्वच क्षेत्रात अष्टपैलू कार्य केले आहे. त्यांनी आता सहकार व शिक्षणक्षेत्रातील धडाडी राजकारणातही दाखवावी. त्यांचे राजकारणातील भवितव्य उज्ज्वल आहे. भाईसाहेब सावंत यांचा वारसा त्यांनी कायम पुढे सुरू ठेवावा. अशा शब्दात सर्वपक्षीय नेत्यांनी विकास सावंत यांच्यावर स्तुतीसुमनांची उधळण केली. निमित्त होते सावंत यांचा गौरव समारंभ. सत्काराचा हा कार्यक्रम रविवारी रात्री येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या मैदानावर पार पडला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवाजी सावंत, शशिकांत सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, सावंतवाडी पालिकेतील नगरसेवक विलास जाधव, राजेंद्र मसूरकर, राजू पनवेलकर, अरूण भिसे, भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विक्रांत सावंत, काँग्रेस सरचिटणीस मंदार नार्वेकर, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, उपसरपंच अभय किनळोस्कर, संजय कानसे, आबा सावंत, चंद्रकांत नाईक, सुनील राऊळ, नकुल पार्सेकर, रेश्मा सावंत, बाळा गावडे आदी सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. माजी राज्यमंत्री प्रविण भोसले म्हणाले, विकास सावंत यांनी राजकारणापेक्षा शिक्षणक्षेत्रात चांगले कार्य केले आहे. त्यांचे सहकार क्षेत्रातील काम राज्यात लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीत त्यांचा आदर्श प्रत्येकानेच घेतला पाहिजे. खरे राजकारण ५० वर्षानंतर सुरू होते. त्यामुळे विकास सावंत यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. शिवाजी सावंत म्हणाले, विकास सावंत यांनी आता शिक्षण व सहकार क्षेत्रापुरते मर्यादित राहू नये. थेट राजकारणात यावे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. आमच्यासारखे सर्वपक्षीय नेते नेहमीच त्यांच्या पाठिशी उभे राहतील. नकुल पार्सेकर म्हणाले, राजकारणात ज्याचा आदर्श ठेवावा, असे व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सावंत यांच्याकडे पाहतो. तसेच ते कुशल संघटक आहेत. त्यांच्याकडून भविष्याच्या राजकारणाची रणनीती सर्वांनी शिकावी. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विकास सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. ते एवढी वर्षे राजकारणात आहेत. पण कधी नेत्यांच्या पुढे-पुढे करताना दिसत नाही. म्हणून ते मागे राहिले. साधे व्यक्तिमत्व, सरळ निर्णय घेणारा माणूस, कोणाच्या मागे न बोलणे हा त्यांचा स्वभाव असल्यानेच आज एवढी जनता त्यांच्यावर प्रेम करताना दिसली.काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, राजकारणात कोणतीही अडचण आली की ज्यांचा सल्ला घ्यावा, असे आमच्यासाठी ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे विकास सावंत होय. यावेळी सत्काराला उत्तर देताना विकास सावंत म्हणाले, जनतेचे एवढे प्रेम आहे, हे पाहून मी भारावून गेलो आहे. यापुढे सहकाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे राजकारणात कायम राहून काम करेन. सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत असे काम माझ्या हातून होईल, असा आशावाद विकास सावंत यांनी बोलताना व्यक्त केला. (प्रतिनिधी)