शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्ष बदलासाठी कोणत्याही टोकाला जाऊ

By admin | Updated: March 23, 2017 23:43 IST

नीलेश राणे यांचा इशारा : अशोक चव्हाण काँग्रेस संघटनेसाठी दुखणे

रत्नागिरी : कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण हे राज्यभरातील कॉँग्रेस संघटनेसाठी दुखणे बनले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांत जे अध्यक्ष देऊ शकले नाहीत, ते राज्यात कॉँग्रेसचे काय भले करणार? हे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत. रत्नागिरीला जिल्हाध्यक्ष मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आम्ही टाळे लावू शकतो, गाड्या अडवू शकतो, टिळक भवनसमोर उभे राहू शकतो, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. कॉँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते गुरुवारी प्रथमच रत्नागिरीत आले होते. राणे यांनी यावेळी प्रदेश नेतृत्वावर खरपूस टीका केली. पदाचा राजीनामा का दिला? याची कारणे मी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रत्नागिरीला जिल्हाध्यक्ष द्या, अशी मागणी करतो आहोत. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणी, स्थानिक कमिट्या स्थापन करता येतील व पक्ष संघटना बळकट करता येईल, हे आमचे म्हणणे होते. मात्र, आधीच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षे चव्हाणांना जिल्हाध्यक्षच सापडला नाही, ही कॉँग्रेससाठी मोठी शोकांतिका आहे. राज्यभरातील इतर कॉँग्रेसजनांकडूनही प्रदेशाध्यक्षांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य वाटले नाही. म्हणूनच अशा कमिटीत राहणे अपमानास्पद वाटले. ा) राज्यभरातील इतर कॉँग्रेसजनांकडूनही प्रदेशाध्यक्षांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य वाटले नाही. म्हणूनच अशा कमिटीत राहणे अपमानास्पद वाटले. हे प्रदेशाध्यक्ष उर्वरित महाराष्ट्रात संघटनेचे काय भले करणार? असा सवालही त्यांनी केला. मी राजीनामा दिला असला तरी कॉँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. माझ्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. माझे पद महत्त्वाचे नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नसेन तर पद कशासाठी हवे, असा सवालही त्यांनी केला. यावेळी राणे म्हणाल, पक्ष हा कार्यकर्त्यांसाठी चालवावा. नेत्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी नको. जिल्ह्यात, राज्यात भाजप व सेना पुढे जात असताना कॉँग्रेस मात्र पिछाडीवर गेली आहे. कॉँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना दिशा देणारे नेतृत्वच नाही. पक्षाने मला अनेक पदे दिली आहेत. त्यामुळे कॉँग्रेस पक्षात मी काल होतो, आज आहे व पुढेही असेन. रत्नागिरीला कोणीही जिल्हाध्यक्ष द्यावा, ही मागणी घेऊन मी दोनदा प्रदेशाध्यक्षांकडे गेलो होतो. मात्र, त्यांचे म्हणणेच कळत नाही. केंद्रीय निरीक्षक मोहन प्रकाश यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची नावे पाठविली असल्याचे चव्हाण म्हणतात. मात्र, खरेच अशी नावे त्यांनी पाठविली की नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. रत्नागिरीला कोणीही जिल्हाध्यक्ष द्या. तसे दोन ओळीचे पत्र पाठवा. आम्ही तो अध्यक्ष मान्य करू. मात्र, दिलेला पदाचा राजीनामा परत घेणार नाही, असेही राणे म्हणाले. (प्रतिनिधी)..तर दुसऱ्या पक्षात वाजत गाजत जाऊमाजी मुख्यमंत्री नारायण राणे कॉँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत विचारता नीलेश राणे म्हणाले, कॉँग्रेस नेते नारायण राणे यांना बंद खोलीत निर्णय घेण्याची सवय नाही व गरजही नाही. ते याच पक्षात राहणार आहेत. याबाबत कॉँग्रेस पक्षातीलच काहीजणांकडून मुद्दाम अफवा पसरविल्या जात आहेत. आम्हाला जर दुसऱ्याच पक्षात जायचे असेल तर गुपचूप जाणार नाही, वाजत गाजत जाऊ, असेही ते म्हणाले.