शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

आतातरी शहाणे होऊया!

By admin | Updated: September 20, 2014 00:22 IST

पा च वर्षांनी पुन्हा एकदा ती संधी आली आहे. सामान्य नागरिक राजा होण्याची. एरवी ज्याला पिळले जाते, छळले जाते, ज्याची सर्वाधिक फसवणूक होते, त्या सर्वसामान्य माणसाला आता खूप भाव दिला जाणार

पा च वर्षांनी पुन्हा एकदा ती संधी आली आहे. सामान्य नागरिक राजा होण्याची. एरवी ज्याला पिळले जाते, छळले जाते, ज्याची सर्वाधिक फसवणूक होते, त्या सर्वसामान्य माणसाला आता खूप भाव दिला जाणार आहे. या दिवसात सर्वचजण झुकतील, रस्त्यात थांबून बोलतील. पण हे फसवं असेल आणि ते काही दिवसांसाठीच असेल. असल्या कसल्याही वागण्याला न भुलता आपल्याला आमदार कसा हवा आहे, हे निश्चित करून मतदानाला जायला हवं. आता मतदाराने शहाणे होण्याची वेळ आली आहे. केवळ निवडणुकीपुरतं राजा होऊन पाच वर्षे सरकारला बोल लावत बसण्यापेक्षा आताच शहाणे होऊन योग्य उमेदवार निवडणं हाच चांगला पर्याय असू शकतो.वर्षानुवर्षे आपण निवडणुकीला सामोरे जातो. आपणच आपले लोकप्रतिनिधी निवडतो आणि मग पाच वर्षे त्याच लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या सरकारला शिव्याशाप देत राहतो. आपणच त्यांना निवडून दिलंय, याचा लोकांना विसर पडतो. आपण त्यांना निवडून देताना डोळे बंद करून मतदान करत नाहीत ना? मग निवडून आल्यानंतर तेच लोक वाईट कसे ठरतात? याला कारण आपणच आहोत. आपण लोकप्रतिनिधी निवडून देताना आपल्या अपेक्षा काय आहेत, याचा विचार करत नाही. त्या अपेक्षा आपल्याकडे मत मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराला, त्याच्या कार्यकर्त्यासमोर मांडत नाही. त्यावर आश्वासनं मिळाली असतील तर त्या आश्वासनांचं पुढे काय झालं, हे कधी विचारत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी आश्वासनं देत राहतात आणि आपण त्यांच्यामागून आंधळेपणाने धावत राहतो. त्यामुळेच मग सरकारला शिव्या देण्याची वेळ येत राहते.खरंतर मतदार म्हणून आपण कधी गांभीर्याने विचारच करत नाही. हवा कोणाची आहे? चलती कोणाची आहे? बडेजाव कोण दाखवतंय? ओळखीचा कोण आहे? जास्त कार्यकर्ते कोणाकडे आहेत? असले कुठलेही प्रश्न विचारात घेतले जातात. पण कुठला उमेदवार सुशिक्षित आहे? कोणाकडे चांगली दृष्टी आहे? विकासाची प्रत्येक उमेदवाराची कल्पना नेमकी काय आहे? त्या उमेदवाराचे चारित्र्य कसे आहे? त्या उमेदवाराचे आर्थिक व्यवहार कसे आहेत? उमेदवाराने आपल्या भागातील कोणत्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले आहे? त्याला कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात? त्या उमेदवाराचा पक्ष कोणता आहे? त्या पक्षाची धोरणे काय आहेत? पक्षाचा जाहीरनामा काय आहे? यासारख्या प्रश्नांवर आपण कधी विचारच करत नाही. यातल्या कितीशा प्रश्नांचे आपला उमेदवाराकडे उत्तर आहे, हे आपण विचारत नाही. न झालेल्या कामांचा जाब विचारत नाही. त्यामुळेच राजकीय पक्ष सर्वसामान्य माणसाला गृहीत धरतात. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं लोक पाच वर्षे लक्षात ठेवत नाहीत, हे साऱ्याच राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना माहिती आहे. त्यामुळे कधी-कधी आधीचीच आश्वासनं ते पुन्हा सांगतात किंवा नवीन सांगतात. पण ती कधी पूर्ण होत नाहीत. बरं त्यातली पूर्ण कुठली होतात, याचा विचारही आपण करत नाही.गटारे बांधणे, पाखाडी बांधणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे ही कामे महत्त्वाची आहेत. पण पुढची काही वर्षे लोकांच्या स्मरणात राहील, असे एखादे तरी काम त्या उमेदवाराने केले आहे का? हा प्रश्न स्वत:लाच विचारून पाहायला हवा. एखाद्याने अशी दीर्घकालीन उपयोगाची कामे केली असतील तर त्याला मते मागण्यासाठी दारोदार फिरावेही लागणार नाही. लोक स्वत:हून त्याच्या पाठीशी उभे राहतील. काही काही उमेदवारांना प्रचारासाठी मतदारसंघात जायलाही लागत नाही, असंही चित्र कुठे-कुठे दिसतं. पण असं सगळीकडेच होत नाही. आपण काहीच केलं नाहीये, याची जाणीव असल्याने उमेदवार घरोघरी जायच्या तयारीतच असतात.आता उमेदवारांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी प्रचारफेऱ्या सुरू होतील. त्यांना प्रश्न विचारायला हवेत. महागाईला जबाबदार कोण आहे, ती कमी होणार की अशीच उत्तरोत्तर वाढत जाणार, याची उत्तरे त्यांच्याकडून घ्यायला हवीत. प्रचार करणं ही साधी बाब नाही. पुढची पाच वर्षे आपलं सर्वस्व याच लोकांच्या हातात आपण सोपवत असतो. एकवेळा खायची भाजी विकत घेताना आपण कितीतरी तपासून घेतो. पण पाच वर्षासाठीचा आमदार निवडताना आपण तपासणी करायची नाही?आताच्या निवडणुकीत फसव्या प्रचारात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे, तो म्हणजे व्हॉटस् अ‍ॅप. या माध्यमातून बेधडकपणे वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जातात. पण त्या तपासून पाहायला हव्यात. एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत जाणारे हे माध्यम खूपच फसवे आहे. त्यात चांगली-चांगली माणसं विशिष्ट उमेदवाराची भलावण करतात आणि अनेक सामान्य माणसं त्याला भुलतात. या माध्यमावरून पसरवले जाणारे समज-गैरसमज हा विषय तर अभ्यासाचाच आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर ग्रुप करून प्रचार करण्याची मोहीम सगळीकडेच राबवली जाते. खरंतर लोकांपर्यंत कामाच्या माध्यमातून पोहोचायचं असतं. पण दीर्घकालीन उपयोगाची, माणूस जगवण्यासाठी उपयोगी पडणारी कामे सांगताच येत नाहीत. त्यामुळे मग इतर आधार घ्यावे लागतात.आपल्या भागात गेल्या पाच वर्षात कोणता उद्योग आला आहे का? लोकांचे जीवनमान उंचावण्यारे काम उमेदवाराने केले आहे का? यावर प्राधान्याने विचार करायला हवा. नकाराधिकाराचे बटण वापरणं म्हणजे आपण लोकशाहीबाबत जागे आहोत, असं म्हणणं चुकीचं आहे. यापैकी कोणीही नाही, हा मुद्दा निवडून सध्यातरी काहीच साध्य होणार नाही. नकाराधिकार वापरणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्याची दखल आत्तातरी घेतली जाणार नाहीये. त्यामुळे आपल्या प्रश्नांपैकी जास्तीत जास्त उत्तरे ज्या उमेदवाराकडून मिळतील, त्या उमेदवाराची निवड करणे हाच पर्याय राहतो. वासरात लंगडी गाय शोधण्याचाच प्रकार होतो, काही ठिकाणी. पण सध्यातरी त्यावर पर्याय नाही. एखादा उमेदवार लोक नाकारत असतील तर तो बदलण्याची तयारी पक्षाने करायला हवी. तसा बदल होत नसेल तर त्याबाबतचा निर्णय तुम्हीआम्हीच घ्यायचा आहे.आताची लोकसभा निवडणूक वगळली तर गेल्या काही वर्षात मतदानाचा ओघ कमी होऊ लागला आहे. मतदानाला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हे जे काय चालले आहे, ते आपल्यासाठी नाही, त्याच्याशी आपला संबंध नाही, असं मानणारा एक मोठा बुद्धीवादी वर्ग आहे. हा वर्ग पंतप्रधानांच्या धोरणांवर गप्पा मारतो. पण प्रत्यक्षात मतदानाला जात नाही. अशांबाबतही निवडणूक आयोग आणि सरकारने अधिक कठोर भूमिका घ्यायला हवी. नाहीतर मतदानाचा वेग पुन्हा खाली यायला वेळ लागणार नाही. देशभरात अब्जावधी रूपये निवडणूक कामासाठी खर्च होतात. किमान त्यासाठी तरी मतदानाचं प्रमाण वाढला हवं. लोकसभा निवडणुकीपासून एक गोष्ट प्राधान्याने पुढे आली आहे की लोक जागे होऊन विचार करू लागले आहेत. नवी पिढी सर्व अंगांनी विचार करणारी आहे. पण नुसतं जागं होऊ चालणार नाही. जागं होण्याबरोबरच शहाणंही व्हायला लागणार आहे. नुसता विचार करून चालणार नाही. विचार करण्याबरोबरच विचारण्याचं धाडस बाळगायला हवं. लोकसभेला मतदानाची टक्केवारी थोडीफार वाढली होती. ती अजून वाढणे गरजेचे आहे. सगळंच राजकारण वाईट नाही. त्यात चांगलेही लोक आहेत. आणि जे वाईट आहेत, त्यांना बदलण्याची ताकद सर्वसामान्यांच्या मतामध्येच आहे. ही ताकद ओळखून शहाणं होऊया... किमान या निवडणुकीपासून तरी...