शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहांकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: June 11, 2015 00:21 IST

पाल्यासाठी सुविधा : सुविधेकडेही गांभीर्याने पाहण्याचा अभाव

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अल्प शुल्कात तसेच शहिदांच्या मुलांसाठी मोफत असलेल्या चिपळूण आणि खेड येथील माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी उभारलेल्या वसतिगृहाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता या वसतिगृहांमध्ये इतर नागरिकांच्या पाल्यानांही यावर्षी प्रवेश दिला जाणार आहे.खेड आणि चिपळूण तालुक्यात माजी सैनिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शासनाने या दोन तालुक्यांतील माजी सैनिकांच्या मुलांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली चिपळूण येथे मुले आणि मुलींसाठी तर खेडमध्ये केवळ मुलांसाठी शासनाच्या मालकीच्या प्रशस्त इमारतीत वसतिगृह सुरू केले आहे. चिपळूण येथील मुले आणि मुलींसाठी असलेल्या वसतिगृहाची प्रत्येकी ६० आणि ४० इतकी प्रवेशक्षमता आहे, तर खेडमध्ये केवळ मुलांसाठी असलेल्या वसतिगृहाची ६०ची क्षमता आहे. या वसतिगृहामध्ये आजी-माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी अत्यल्प शुल्कात प्रवेश, तर शहीद सैनिकांच्या पाल्यांसाठी, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी व माजी सैनिकाच्या अनाथ पाल्यांसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे.मात्र, ही सुविधा असूनही प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अल्प आहे. या कार्यालयातर्फे माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवा पत्नी, मुले यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कल्याण संघटक महिन्यातून दोन दिवस प्रत्येक तालुक्याचा दौरा करतात. तरीही या वसतिगृहांसाठी प्रवेशित मिळत नाहीत. त्यामुळे आता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून उपलब्धतेनुसार इतर नागरिकांच्या (सिव्हीलियन्स) पाल्यांना निर्धारित दर आकारुन वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या रकमेत निवासाची सोय, नाष्टा, जेवण, मनोरंजन, खेळ, ग्रंथालय इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे.वसतिगृह प्रवेश पुस्तिका संबंधीत वसतिगृह अधिक्षकांकडे उपलब्ध आहेत. सैनिकी मुलांचे वसतिगृह चिपळूण, सैनिकी मुलींचे वसतिगृह, चिपळूण आणि सैनिकी मुलांचे वसतीगृह, खेड येथे संपर्क साधावा आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी असलेल्या वसतिगृह सुविधेकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)