शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘कौशल्य विकास’कडे लाभार्थ्यांची पाठ

By admin | Updated: February 15, 2016 23:58 IST

राजकीय स्तरावर उदासीनता : मोफत प्रशिक्षण असूनही बेरोजगारांचे दुर्लक्ष

रत्नागिरी : केंद्र शासनातर्फे गेल्या सप्टेंबरपासून देशभर कै. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत देशातील तरुणांना कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे. मात्र, ही सर्व प्रशिक्षण मोफत असूनही याकडे बेरोजगारांची पाठ फिरलेली दिसून येते. सध्या बेकारी वाढल्याची ओरड होत असली तरी अशांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची उणीव जाणवत असल्याचे दिसून येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०११ सालापर्यंत देशातील ५० कोटी व्यक्तिंना रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र शासनानेही राज्यातील साडेचार कोटी व्यक्तिंना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्यात कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनांतर्गत कौशल्यावर आधारित रोजगार, स्वयंरोजगारासंबंधी एकूण ६८ क्षेत्रातील एकूण ५७७ विषयांवर मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी (बेरोजगार उमेदवार) बरोबरच संबंधित विषयातील तज्ज्ञ, संस्था, प्रशिक्षण संस्था, समुपदेशक यांनाही रोजगार मिळणार आहे. या योजनेअंतर्गत कौशल्यावर आधारित रोजगार, स्वयंरोजगर संबंधी उदा. बांधकाम, मॅन्युफॅक्चरिंग आॅटोमाबाईल, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, संघटित व्यापार, फर्मास्युटिकल व केमिकल, टेक्सटाईल, अ‍ॅग्रो प्रोसेसिंग विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ँ३३स्र२:// ेंँं‘ं४२ँं’८ं.ूङ्मे हे वेबपोर्टल कार्यान्वित केले. या वेबपोर्टलवर लाभार्थी (बेरोजगार उमेदवार) संबंधित विषयातील तज्ज्ञ, संस्था, प्रशिक्षण संस्था, समुपदेशक यांनी नोंदणी केल्यास लाभार्थींना त्यांना आवश्यक असलेल्या व्यवसायासाठी तज्ज्ञ समुपदेशक तसेच प्रशिक्षण संस्थेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, या वेबपोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने काही महिन्यापासूनच त्याला पर्यायी असे टररऊर या नावाने वेबपोर्टल उपलब्ध करून दिले आहे.या प्रशिक्षणात १४ ते ४५ या वयोगटातील कोणताही उमेदवार सहभागी होऊ शकतो. ही सर्व प्रशिक्षणे शासनामार्फत मोफत देण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे; तर त्यातून ज्या संस्थांमार्फत प्रशिक्षण घेणार, त्या संस्थेकडून रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, असे असूनही या सर्व प्रशिक्षणाकडे लाभार्थींनी पाठ फिरवलेली दिसते. एकीकडे बेरोजगारी वाढतेय, रोजगार संधी मिळत नाही, अशी ओरड असतानाच शासनाने मोफत देऊ केलेल्या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत लाभार्थींना प्रोत्साहित करण्यासाठी राजकीय स्तरावरून दुर्लक्ष होत असल्याचे आता दिसत असून, कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडूनही यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अतिशय चांगल्या अशा या विविध प्रकारच्या प्रशिक्षणांकडे लाभार्थ्यांचा अल्पसा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चांगली योजना असूनही तिच्या यशस्वीतेबाबत शंका निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न.५७७ विषयांवर मोफत प्रशिक्षण देण्यात येणार.संबंधित विषयातील तज्ज्ञ, संस्था, समुपदेशक यांनाही रोजगार.