शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

भातकापणीवर लेप्टो रोगाची टांगती तलवार

By admin | Updated: October 21, 2016 23:30 IST

जिवाणूंशी येतोय प्रत्यक्ष संबंध : शेतकऱ्यांमध्ये धास्ती

सुरेश बागवे कडावल ग्रामीण भागात भातकापणीच्या कामास वेग आला आहे. परिणामी लेप्टो स्पायरोसिसच्या जिवाणूंचे वसतिस्थान असू शकणाऱ्या भात खाचरांशी आता शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध येऊ लागला आहे. जिल्ह्यातील अनेक व्यक्तींचे बळी घेतलेल्या या रोगाचे सावट अद्याप पूर्णत: दूर झालेले नाही. खरीप भात लावणी आणि भातकापणीच्या काळातच या जीवघेण्या रोगाने डोके वर काढल्याचा पूर्व इतिहास असल्याने येथील शेतकऱ्यांना भातकापणीबरोबरच लेप्टोचीही चिंता भेडसावू लागली आहे. जिल्ह्यातील जनतेला गेल्या काही वर्षांपासून लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला कणकवली तालुक्यातील काही गावांपर्यंतच मर्यादित असलेल्या लेप्टोनंतर जिल्ह्याच्या इतर भागातही थैमान घालायला सुरुवात केली. या रोगामुळे आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लेप्टोच्या प्रभावाखाली प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनता अधिक प्रमाणात आल्याचे दिसून येते. विशेषत: भात लावणी व कापणीच्या काळातच या रोगाचा अधिक फैलाव झाल्याचा पूर्वइतिहास असून, आजपर्यंत या रोगामुळे गेलेल्या बळींमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. लेप्टो जिवाणूंचे उगमस्थान असलेल्या उंदीर, घुशींचा वावर जेथे अस्वच्छता व अडगळ असेल तेथे मोठ्या प्रमाणात असते. तेथे त्यांनी विसर्जित केलेल्या मूत्रातील जिवाणू आसपासच्या परिसरात तसेच भात खेचरात स्थिरावतात. केवळ दोन मिलीलिटर मूत्रात सुमारे दहा कोटी जिवाणूंचा अधिवास असू शकतो. यावरून याची भयानकता सहज लक्षात येते. पायरोजन, हेप्टोमेडिस, पुनामा व इक्टिरोहिमोरेडिका, आदी लेप्टोचे प्रमुख ज्ञात जिवाणू आहेत.