शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:54 IST

सावंतवाडी : साटेली-देवळसवाडी येथे घरालगत असलेल्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पडला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, ...

सावंतवाडी : साटेली-देवळसवाडी येथे घरालगत असलेल्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पडला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, याबाबतची माहिती वनविभागाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले.साटेली-सातार्डा परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बºयाचदा बिबट्यांचे दर्शन अनेकांना झाले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण असतानाच शनिवारी रात्री रामचंद्र्र बावकर यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत बिबट्या पडला. रविवारी सकाळी हा बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडल्यानंतर तेथे अनेकांनी धाव घेतली. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेची माहिती ग्रामस्थ प्रशांत साटेलकर यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी आले.यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनरक्षक विशाल पाटील, ज्ञानेश्वर जाधव, विश्वनाथ माळी, संतोष मोरे, सागर ओझन आदींनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी विहिरीत दोरीच्या सहाय्याने पिंजरा सोडला. त्यानंतर शर्थीच्या प्रयत्नाने बिबट्याला पिंजºयात बंदिस्त करण्यात वनविभागाला यश आले. या मदतकार्यात बबन रेडकर, संजय नाईक, प्रशांत साटेलकर, सुरेश नाईक, सुधीर बावकर, पिंट्या कुबल आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला. बिबट्यावर पशुवैद्यकीय अधिकाºयांमार्फत उपचार करून उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.