शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रामा केअरचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: September 4, 2014 00:06 IST

सावंतवाडीत सुविधा : लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी

प्रसन्न राणे - सावंतवाडी -येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या ट्रामा केअरचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. लवकरात लवकर या ट्रामा केअरअंतर्गत शस्त्रक्रिया विभाग सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा. तसेच येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दिवसरात्र सेवा देणारे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. उत्तम पाटील यांच्यासारखे वैद्यकीय अधिकारी या ट्रामा केअर सेवेस मिळाल्यास रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मत व्यक्त होत आहे. या ट्रामा केअरचे काम मंद गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत ट्रामा केअरच्या कन्स्ट्रक्शनचे काम पूर्ण झाले आहे. रुग्णांसाठी आवश्यक बेड, शस्त्रक्रिया विभाग, लॅब आदी सामुग्रीची आता आवश्यकता असून लवकरात लवकर या सर्व मशिनरीज ट्रामा केअर सेंटरमध्ये उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ट्रामा केअर सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करून लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा के अर सेंटरचा लाभ सावंतवाडीवासीयांसह जिल्हाभरातील रुग्णांनाही मिळणार आहे. गेल्या वर्षभरात झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावर अनेक ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये काहींना प्राण गमवावे लागले आहेत. तर काहीजण जायबंदी झाले. अशा अपघातातील जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेची तत्काळ सेवा देण्यात आली. या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये असणारे डॉ. पियुष येझरे, डॉ. बी. आर. कुंभार यांनी वेळीअवेळी, अहोरात्र अपघातग्रस्त रुग्णांना या रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयापर्यंत आरोग्य सेवा देण्याकरिता आणले. परंतु रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने या जखमींना गोवा- बांबोळी येथे हलवावे लागते. या प्रवासात गंभीर जखमी रुग्ण दगावण्याची शक्यता असते. ट्रामा केअरद्वारे या रुग्णांवर उपचार झाल्यास अशा रुग्णांना जीवदान मिळणार आहे. गंभीर जखमींना जीवदान मिळणारसावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक शस्त्रक्रिया उपलब्ध नसल्याने रूग्णांना गोवा-बांबोळी येथे हलवित असतानाच यातील काही रुग्णांचा मृत्यू झाला. ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्ण झाल्यास अपघातातील गंभीर जखमींना जीवदान मिळू शकते. यासाठी ट्रामा केअरचे काम शक्य तेवढ्या जलद गतीने पूर्ण करून रुग्णांच्या सेवेस उपलब्ध करणे आवश्यक आहे.