शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंधुदुर्ग’च्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: December 7, 2015 00:14 IST

रेल्वेमंत्र्यांना आराखडा : शिवरायांच्या पराक्रमाचे साडेतीनशेव्या वर्षात पदार्पण

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग हा गेल्या ३५० वर्षाहून अधिक काळ समुद्र्राच्या लाटांचे तडाखे आणि जोरदार वाऱ्यांशी सामना करत दिमाखात उभा आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी येथीलच ‘किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. गेली नऊ वर्षे ही समिती किल्ले सिंधुदुर्ग येथे विविध उपक्रम राबवित आहे. २२ एप्रिल २०१६ रोजी किल्ले सिंधुदुर्ग ३५० व्या वर्षात पदार्पण करत असून, यानिमित्ताने प्रेरणोत्सव समितीच्यावतीने किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या सर्वसमावेशक आराखडा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर केला जाणार आहे. या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती प्रेरणोत्सव समितीचे नूतन अध्यक्ष गुरुनाथ राणे यांनी ‘लोकमत’ला दिली.गच्च अंधारात दिसू न शकणारे किल्ल्याचे सौंदर्य उजळवण्याचा विडा भारतीय पुरातत्त्व खात्याने सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या सहाय्याने उचलला आहे. यासाठी किल्ल्याभोवती वॉटरप्रुफ दिवे बसविण्यात येणार आहेत. किल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापन दिन डोळ्यासमोर ठेऊन किल्ल्याची संपूर्ण डागडुजी व भव्यदिव्यतेसाठी आराखडा करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग व तज्ज्ञ मंडळींकडून करण्यात येत आहे. पर्यटनदृष्ट्या सर्वसमावेशक व परिपूर्ण असा हा आराखडा असणार आहे. शहरात ऐतिहासिकतेचे वातावरण निर्माण करणारप्रेरणोत्सव समिती सामाजिक कार्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभेद्य किल्ले सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे राहिली आहे. एप्रिल २०१६ साली किल्ला ३५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे प्रेरणोत्सव समितीने आत्तापासून विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. ३५० व्या वर्षानिमित्त सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी सिंधुदुर्गवासीयांना दिली जाणार आहे. त्यासाठी समितीच्यावतीने शहरात ऐतिहासिकतेचे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. सर्व सभासदांनीही महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे, असे गुरुनाथ राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गुरुनाथ राणे यांची निवड झाली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष दत्तात्रय नेरकर, ज्योती तोरसकर, सचिव विजय केनवडेकर, सहसचिव गणेश कुशे, खजिनदार हेमंत वालकर, सदस्य भाऊ सामंत, मुकेश बावकर, रामचंद्र काटकर, नरेश कालमेथर, वैशाली शंकरदास, सचिन गोवेकर, लक्ष्मीकांत कांबळी, रविकिरण तोरसकर, प्रदीप वेंगुर्लेकर, मानद सदस्य म्हणून राजीव परुळेकर, भूषण साटम यांचा समावेश आहे.प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे यांची माहिती.आराखडा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर करणार.सिंधुदुर्गवासीयांना मिळणार सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी.