शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

समर्थ हत्तीने घेतला अखेरचा श्वास

By admin | Updated: May 29, 2015 23:55 IST

सिंधुदुर्गातील घटना : दीड महिन्यापूर्वी ‘गणेश’चा मृत्यू

माणगाव : माणगाव आंबेरी येथे पकडून ठेवण्यात आलेल्या तीन हत्तींपैकी ‘गणेश’ या हत्तीने दीड महिन्यापूर्वी देह ठेवल्यानंतर शुक्रवारी आजारी समर्थ हत्तीने आपला देह ठेवला. दोन दिवसांपासूनच या हत्तीला क्रॉलबाहेर काढून मुक्त हवेत ठेवण्यात आले होते; पण शुक्रवारी अचानक दुपारनंतर समर्थची प्रकृती ढासळू लागली आणि कोणाला काही कळायच्या आतच सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याने आपला देह ठेवला. या घटनेने पुन्हा एकदा माणगाव परिसर हादरून गेला आहे. समर्थ हत्तीच्या पायाला जखम झाल्याने तो आजारी होता. त्याच्या पायाला सूजही आली होती.माणगाव खोऱ्यात गेली दहा वर्षे हत्तींनी धुमाकूळ घातला होता. हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने पकडण्यात आले होते. त्यांचे नामकरण गणेश, समर्थ व भीम असे करण्यात आले; पण पकडून अवघे काही दिवस होत नाही, तोच गणेश हत्तीने १० एप्रिलला म्हणजेच दीड महिन्यापूर्वी देह ठेवला. त्यानंतर ‘समर्थ’च्या आजारपणाच्या बातम्या एकामागोमाग येऊ लागल्या. कर्नाटक येथील डॉ. उमाशंकर यांनी स्वत: आंबेरीत येऊन त्याच्यावर उपचार केले. या उपचारांना समर्थने प्रतिसादही दिला. त्याला क्रेनचा आधार देऊन उठविले होते. त्याच्या पायाला झालेली जखमही बरी होत होती. परंतु, पायाची सूज उतरत नसल्याचे वेळोवेळी दिसत होते.दोन दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांच्यासह मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी आंबेरी येथे येऊन क्रॉलबाहेर काढण्यास परवानगी दिली. दोन दिवस हे हत्ती मुक्त विहार करीत होते.अस्वस्थ समर्थची अखेरसकाळपासून मुक्तपणे फिरणारा समर्थ हत्ती अचानक तीन वाजता खाली बसला. त्यामुळे वन विभागाने स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. तोपर्यंत चार वाजले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘समर्थ’ला पाहिल्यानंतर त्याचा प्रवास थांबला होता. त्यामुळे मृत घोषित केले.आज शवविच्छेदन ‘समर्थ’चा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी ही घटना उशिरा घडली. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना शवविच्छेदन करण्यास रात्र होईल, असे वाटत असल्यानेच शनिवारी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.