शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

डोळे काढण्याची भाषा दानवेंना अशोभनीय

By admin | Updated: June 26, 2015 22:10 IST

धीरज परब : अटक करण्याची निवेदनातून मागणी

कुडाळ : राजन तेली व भाजप कार्यकर्त्यांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचे डोळे फोडल्याशिवाय राहणार नाही, असे चिथावणीखोर वक्तव्य करून राजकीय दहशत निर्माण करू पाहणाऱ्याभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर जिल्ह्यातील सार्वजनिक शांततेचा भंग करून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब व कुडाळ तालुका मनसेच्यावतीने निवेदनातून जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे केली.या निवेदनात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब म्हणाले की, भाजपाच्यावतीने मंगळवारी कार्यकर्ता मेळावा शिबिरामध्ये राजन तेली व भाजप कार्यकर्त्यांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचे डोळे फोडल्याशिवाय राहणार नाही, असे चिथावणीखोर वक्तव्य केले.दानवे यांचे असे वक्तव्य म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने सिंधुदुर्गातील सर्वसामान्य जनतेला दिलेली ही जाहीर धमकीच आहे. दानवेंच्या या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक शांततेचा भंग झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय दहशत करू पाहणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. राजकीय दबाव झुगारुन दानवे यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनसे महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेेंडे, मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष बाबल गावडे, दीपक गावडे, सुश्मित देसाई बांबुळकर, जगन्नाथ गावडे, प्रथमेश धुरी, अभय पाटील, ऋषिकेश तावडे, प्रथमेश चव्हाण, नंदू आंदुर्लेकर, अमोल भेंडे आदी मनसेचे जिल्हा व कुडाळ तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)