शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाचा तिढा बाकी, तरी चौपदरीकरणाचे भूमिपूजन?

By admin | Updated: January 15, 2016 00:18 IST

मुंबई-गोवा महामार्ग : जमीनमालक आंदोलनाच्या पवित्र्यात...

प्रकाश वराडकर-- रत्नागिरी --बहुचर्चित मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मात्र, या चौपदरीकरणातील हरकतींचे अडथळे अद्याप दूर झालेले नाहीत. त्यामुळे केवळ भूमिपूजन करून चौपदरीकरणाचा मार्ग कसा काय मोकळा होणार, याचीच चर्चा सुरू आहे. अधिकारी स्तरावर यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जमीन मालकही आक्रमक झाले असून, आता त्यांच्या संघर्षाला राजकीय किनारही मिळाली आहे. जमीन मालकांच्या हरकतींचा निकाल लागण्याआधी व जमीनमालक आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच या हरकती, विरोधाला न जुमानता चौपदरीकरण सुरू करण्यात येणार काय, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. चौपदरीकरणात ज्यांच्या जागा, घरे, दुकाने जात आहेत, अशा शेकडो लोकांनी जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयांमध्ये हरकती नोंदविल्या आहेत. रत्नागिरीत या हरकतींवर सुनावणीही झाली आहे. त्यानंतर जमीन मालकांमध्ये अधिकच तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. चौपदरीकरणात चिपळुण, संगमेश्वर, पाली, लांजा या बाजारपेठा उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे या बाजारपेठा वाचविण्यासाठी जमीनमालक सरसावले आहेत. हा लढा लढण्यासाठी काही जमीन मालकांनी कायदेशीर तज्ज्ञांचीही मदत घेतली आहे. त्यामुळे जमीन संपादनाबाबतचा विषय गाजण्याची शक्यता आहे. एकीकडे हरकती दाखल असतानाच जमीनमालकांच्या बाजूने या लढ्यात माजी खासदार नीलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. चौपदरीकरणात जात असलेल्या जागेचा मोबदला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणेच मिळावा, यासाठी निलेश राणे आग्रह धरणार आहेत. त्यासाठी आंदोलनाचीही शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, त्यासाठी जमीन मालकांच्या समस्याही सोडविल्या जाव्यात, असे सध्याचे जनमत आहे.