शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेती, बागायतींचे लाखोंचे नुकसान

By admin | Updated: July 17, 2014 23:08 IST

तेरेखोल नदीला उधाण : सिमेंट काँक्रिटची भिंत बांधण्याची मागणी

बांदा : तेरेखोल नदीच्या उधाणामुळे बांदा येथील रामनगर, मिठगुळी परिसरातील शेकडो एकर शेती बागायती नदीपात्रात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.या परिसराला दरवर्षी तेरेखोल नदीच्या उधाणाचा फटका बसतो. आतापर्यंत शेकडो एकर शेती बागायती नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे. यामुळे बांदा व आरोसबाग येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आरोसबाग येथील संजय चांदेकर यांच्या बागायतीला या उधाणाचा फटका बसला. त्यांच्या बागायतीमधील चार माड व ९ पोेफळी नदीपात्रात वाहून गेल्या. तर कित्येक गुंठे बागायतींची जमीन खचली आहे.पावसाळ्यात तेरेखोल नदीपात्र दुथडी भरुन वाहते. नदीपात्रालगत शेतकऱ्यांनी नारळ, सुपारी, आंबा, फणस, सागवान बागायती फुलविल्या आहेत. तेरेखोल नदीचे पाणी या बागायतीत घुसत असल्याने येथील जमीन पूर्णपणे खचली आहे. यावर्षी नदीच्या उधाणाचा मोठा फटका बागायतींना बसला आहे.पावसाळ्याच्या दोन महिन्यातच शेकडो एकर बागायती नदीपात्रात वाहून गेली आहे. बांदा परीसरातील रामनगर, मिठगुळी परिसरातील नारळ, सुपारींची झाडे नदीपात्रात उन्मळून पडली आहेत. बांदा व आरोसबाग येथील शेतकऱ्यांच्या बागायती याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत.तेरेखोल नदीच्या उधाणामुळे या बागायतींना नेहमीच फटका बसत असल्याने याठिकाणी खारलॅण्ड बंधारा बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. तीन वर्षापूर्वी याठिकाणी तीस मिटर लांबीचा बंधारा बांधण्यात आला. याचा फायदा देखील झाला. मात्र, रामनगर, मिठगुळीपर्यंत बंधारा बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मेरीटाईम बोर्डाने दरवर्षी तीस मिटर बंधारा बांधण्याचे प्रस्तावित केले. मात्र, गतवर्षी बंधारा बांधण्यास निधी मंजूर न झाल्याने संरक्षक भिंतीचे काम रखडले. यावर्षी मोठ्या प्रमाणात जमीन खचल्याने यावर्षी विशेष बाब म्हणून संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.लाकडी साकवही अडचणीतआरोसबाग ग्रामस्थ दरवर्षी बांद्यात येण्यासाठी उन्हाळ्यात तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने लाकडी साकव उभारतात. मात्र, साकव उभारताना बांद्याकडील नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात जमीन नदीपात्रात कोसळल्याने यावर्षी साकव बांधणे धोकादायक बनले आहे. अजून दोन महिने पावसाळा शिल्लक असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन खचण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी आरोसबागवासीयांना बांद्यात येण्यासाठी होडीचाच आधार घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)