शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कुणकेश्वरचरणी अलोट गर्दी

By admin | Updated: February 26, 2017 00:21 IST

आज तीर्थस्नानाची पर्वणी; लाखो शिवभक्तांनी घेतले दर्शन

कुणकेश्वर : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि महाशिवरात्री उत्सवानिमित्त तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. सलग सुट्या आल्याने शनिवारी या यात्रेला भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी अमावास्या असल्याने तीर्थस्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होईल तसेच सायंकाळी मोड यात्रेने समारोप होणार आहे. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुटी असल्याने शिवभक्तांनी गर्दीचा उच्चांक केला होता. सलग सुट्यांमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील भक्तांनी मोठ्या संख्येने कुणकेश्वर क्षेत्री गर्दी केली आहे. महसूल विभाग, सनातन संस्था, दंतचिकित्सा शिबिर अशासारख्या विविध स्टॉलमधील सेवांचा भाविकांनी लाभ घेतला. समुद्रकिनाऱ्यानजीक रस्ता व पार्किंगची व्यवस्था असल्याने आबालवृद्धांची गैरसोय झाली नाही. मंदिर व परिसरातील आकर्षक फुलांची सजावट व परिसरातील विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत आहे. त्यामध्ये मालवण खाजा, कलिंगड खरेदीकडे भाविकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. समुद्रकिनारी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यामध्ये भाविकांनी घोडा व उंट सफर करण्याची मजा अनुभवली. क्लोज सर्किट कॅमेऱ्यामुळे यात्रा परिसर व समुद्रकिनारा नजरेखाली ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच एलईडी स्क्रीन व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून यात्रेचे विहंगम दृश्य भाविकांना पाहता येत आहे.देवगड, विजयदुर्ग, मालवण, कणकवली आदी एस. टी. आगारामार्फत या यात्रेसाठी खास एस. टी.ची सोय करण्यात आली होती. हॅम रेडिओप्रणाली, पोलिस प्रशासन यांच्यामुळे हरविलेल्या व्यक्तींचा सहज शोध घेता येणे शक्य झाले. हॉटेल व इतर स्टॉलधारकांकडून निर्माण होणारा कचरा देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या गाड्यांकडून वेळोवेळी गोळा करून संपूर्ण यात्रा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत होता. कुणकेश्वरकडे येणाऱ्या मार्गामध्ये सुयोग्य बदल केल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होती.जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर आदींचा श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने यावेळी सत्कार करण्यात आला. रविवारी अमावास्या असल्याने भाविकांना तीर्थस्नानाचा लाभ घेता येणार आहे. यात्रोत्सव मोड यात्रेपर्यंत असाच सुरू राहणार आहे. (वार्ताहर)