शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळचा पहिला नगराध्यक्ष भाजपचाच

By admin | Updated: April 15, 2016 23:33 IST

माधव भांडारी : जाहीर प्रचार सभा

कुडाळ : आमच्या भाजप पक्षाला केंद्रात व राज्यात ज्याप्रमाणे मतदारांनी साथ दिली त्याचप्रमाणे कुडाळचा विकास करण्यासाठी येथील मतदारांनी भाजपला साथ द्यावी, विकास करून घ्यावा, असे आवाहन भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी कुडाळ येथील जाहीर प्रचार सभेत केले. तसेच कुडाळचा पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार असून ही निवडणूक जिल्ह्याचा टर्निंग पॉईट ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कुडाळ येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन गुरुवारी सांयकांळी पाच वाजता आयोजन करण्यात आले होते. सभेला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राज्य सरचिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, नीलेश तेंडुलकर, सर्फराज नाईक, तसेच उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना भांडारी म्हणाले की, कुडाळचा पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे, मात्र कुडाळवासियांनी आम्हाला कोणाची मदत घेण्याची वेळ यायला देऊ नका, असे आवाहन ही केले.यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचीच सत्ता येणार असून, आम्ही त्याची तयारी देखील सुरू केली आहे. आता यापुढे आम्ही कोणाचीच मदत घेणार नसल्याचेही सांगितले, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)युती विधानसभेनंतर तुटली : भांडारीया ठिकाणी भाजप स्वतंत्र लढत आहे. तसेच यापुढच्या सर्व निवडणुकांमध्ये ही स्वतंत्र लढणार आहे. शिवसेनेसोबत असलेली युती ही विधानसभेनंतर तुटली असल्याचेही भांडारी यांनी सांगत ‘एकला चलो रे ची’ री ओढली आहे. आमचा पक्ष हा माजी आमदारांचा पक्ष आहे, असे म्हणणारे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, ते माजीच राहतील, असा टोला भांडारी यांनी नारायण राणे यांना लगावला.यावेळी बोलताना आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने कोकणाला झुकते माप दिले, असून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहे.