शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ नगरपंचायत निवडणूक अर्ज न भरण्यासाठी दबाव

By admin | Updated: March 20, 2016 23:49 IST

कॉँग्रेसचा उमेदवार रुग्णालयात : भाजपच्या पदाधिकाऱ्याबाबत चर्चा

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक आठमधून इच्छुक असलेल्या एजाज नाईक यांना काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज न भरण्याबाबतचा फोन विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्याने केल्याने नाईक यांची प्रकृती खालावली. त्यांना कुडाळातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हा फोन भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, उपचार घेत असलेल्या एजाज नाईक यांची भेट आमदार नीतेश राणे यांनी घेत त्यांची विचारपूस केली. कुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७ एप्रिलला निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ सर्व राजकीय पक्ष, तसेच इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये उडाली आहे. प्रभाग क्रमांक आठ मस्जीद मोहल्लामधून एजाज नाईक हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून शनिवारी मुलाखतीसाठी गेलेल्या एजाज नाईक यांना भाजपने उमेदवारी न भरण्याबाबत सुनावले. यामुळे नाईक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कुडाळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)‘भाजप’कडून आला फोन?एजाज नाईक यांना आलेला हा फोन भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आल्याची चर्चा कुडाळ शहरातील राजकीय वर्तुळात रंगली होती.कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षातील प्रमुख मंडळींना उमेदवारीबाबत निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. निवडणुकीबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच शनिवारी भाजप पदाधिकाऱ्याच्या या फोनमुळे नाईक अस्वस्थ झाल्याने कुडाळातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.