शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकण विकास मंडळाला लवकरच मान्यता शक्य

By admin | Updated: April 8, 2015 23:57 IST

घटना दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव सादर

रत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी भारतीय घटनेच्या संबंधित कलमामध्ये दुरुस्ती करण्याच्या हेतूने राज्य शासनाने केंद्रीय स्तरावर कार्यवाहीला प्रारंभ केला असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीअंती दिली.राज्यातील विदर्भ विकास महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ आदींना विविध योजना वा घटक योजनांतून वेळोवेळी तत्सम प्रकारचे सहकार्य होत असते. यामुळे या ठिकाणी कोकणाच्या तुलनेत राज्यातील हे प्रदेश संबंधित आघाड्यांवर पुढारलेले दिसत असून, याठिकाणी अनेकविध सुविधा उपलब्ध होत असतात. या बाबीच्या पार्श्वभूमीवर निसर्गाने भरभरुन दिलेल्या कोकणासाठीही स्वतंत्र विकास महामंडळ असावे, या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोकणातील शिवसेनेचे आमदार सातत्याने जोरदार पाठपुरावा करीत आहेत. या मागणीला शिवसेनेसोबत भाजपाच्या मंडळींनीही अनुकूलता दर्शवित पाठिंबा दिला होता.आता राज्यासह केंद्रात शिवसेना - भाजपाची सत्ता आल्याने स्वतंत्र कोकण विकास महामंडळाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. कोकण महामंडळाची अंमलबजावणी करण्यासाठी या घटनात्मक बाबींची पूर्तता करण्याच्या हालचालींनी वेग घेतला असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिली. तसेच कोकणसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी भारतीय घटनेच्या कलम ३७१ (२) (अ)मध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला सादर केलेल्या प्रस्तावाप्रती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनाही पत्र देऊन विनंती केली असल्याचे साळवींनी सांगितले. महामंडळाच्या स्थापनेबाबत राज्य शासनाकडून चालू झालेल्या या कार्यवाहीची लेखी माहिती कोकणातील संबंधित लोकप्रतिनिधी व तत्सम यंत्रणेलाही दिली जाईल, असेही मुनगंटीवार यांनी आमदार साळवींना सांगितले. (प्रतिनिधी)