शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीसाठी कोकण रेल्वेचा आता खास ‘फिरता रॅम्प’

By admin | Updated: February 19, 2015 23:40 IST

तांत्रिक विभागाची कमाल

रत्नागिरी : कोकण रेल्वेला मालवाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळावे, यासाठी गुडस् ‘लोडिंग-अनलोडिंग’ची व्यवस्था सर्व रेल्वे स्थानकांवर करण्याची अभिनव सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी कोठेही नेता येईल, असा विशेष रॅम्प कोकण रेल्वेने विकसित केला आहे. हापूस वा कोकणातील अन्य उत्पादने कोणत्याही रेल्वे स्थानकावरून मालगाड्यांमध्ये नेणे शक्य होणार आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष भानू प्रकाश तायल यांनी दिलेल्या या माहितीमुळे कोकणातील व्यवसायांना उभारी मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या माल वाहतूक गाड्यांमधून कोकणातील माल अन्यत्र पाठवायचा असेल तर तो कोलाडला नेणे आवश्यक होते. त्यामुळे येथील उद्योजक, बागायतदार यांची गैरसोय होत होती. हा प्रश्न गेले अनेक दिवस ऐरणीवर होता. कोकण रेल्वेला प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप कोकण रेल्वेला माल वाहतुकीपेक्षा प्रवासी वाहतुकीतूनच अधिक उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्गावरून सध्या दररोज ६० गाड्या धावत आहेत. प्रवासी वाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळत असल्याने प्रवासी, एक्सप्रेस अशा विविध गाड्या वाढवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मालवाहतुकीतून मात्र त्यामानाने कमी उत्पन्न मिळत आहे.अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या कोकण रेल्वेला गेल्या पाच वर्षांच्या काळात मात्र नक्त नफा (नेट प्रॉफीट) मिळत आहे. परंतु माल वाहतुकीतून मात्र अपेक्षित उत्पन्न अजूनही मिळालेले नाही. गेल्या तीन वर्षांच्या काळात सातत्याने माल वाहतुकीपेक्षा प्रवासी वाहतुकीचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे. (प्रतिनिधी)तांत्रिक विभागाची कमालगेल्या तीन वर्षात सातत्याने कमी असलेले कोकण रेल्वेचे मालवाहतुकीतील उत्पन्न वाढवणे हे कोकण रेल्वेसमोर मोठे आव्हान ठरले. हे आव्हान पेलण्यासाठी नेहमीप्रमाणेच कोकण रेल्वेच्या तांत्रिक विभागाने आपल्या तंत्रज्ञानाची कमाल दाखवली आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांच्या अथक मेहनतीतूून माल लोडिंग-अनलोडिंगसाठी खास फिरता रॅम्प तयार करण्यात आला असून, चाचण्यांमध्ये त्याची उपयोगिताही सिध्द झाली आहे. त्यामुळे आता कोकणातील आंबा बागायतदार, अन्य उद्योजकांनीही रेल्वेद्वारे मालवाहतुकीचा लाभ घेतल्यास त्यांच्या वाहतूक खर्चात नक्कीच कपात होईल. सनप्रवासी वाहतूकमाल वाहतूक२०११-१२३३२.५२ कोटी३२९.४३ कोटी२०१२-१३३७६.७२ कोटी३४०.३२ कोटी २०१३-१४४५१.१२ कोटी४१३.५० कोटीप्रत्येक स्थानकावर ‘गुड्स लोडिंग-अनलोडिंग’ शक्य.मालवाहतुकीतून उत्पन्नवाढीसाठी कोकण रेल्वेचा प्रयत्न.हापूस वा कोकणातील अन्य उत्पादने कोणत्याही रेल्वे स्थानकावरून मालगाड्यांमध्ये नेणे शक्य होणार.कोकणातील व्यवसायांना उभारी मिळणार.मालवाहतुकीपेक्षा प्रवासी वाहतुकीचे उत्पन्न अधिक.