शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:53 IST

वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, करूळ घाटात दिंडवणेवाडीनजीक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. जेसीबीद्वारे दरड हटवून मार्ग खुला करण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरल्यामुळे विसर्ग ...

वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, करूळ घाटात दिंडवणेवाडीनजीक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. जेसीबीद्वारे दरड हटवून मार्ग खुला करण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरल्यामुळे विसर्ग वाढला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी १०.३०च्या सुमारास मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला पाणी कमी असल्याने पाण्यातून वाहतूक सुरू होती. रस्त्यावरील पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेवटी सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी सकाळी ११ वाजता गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून गगनबावड्यात गेलेली वाहने करुळ-वैभववाडी-फोंडाघाटमार्गे फिरविली.गगनबावडा पोलिसांनी कोल्हापूर मार्ग बंद केल्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांसह राज्य परिवहन महामंडळाला तातडीने कळविली. त्यामुळे वाहतूक नियंत्रकांनी वैभववाडीतून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस तर पोलिसांनी अन्य वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली. कोल्हापूरकडे जाणाºया वाहनांना करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी अटकाव करूनही जबरदस्तीने काही वाहनचालक गगनबावड्यात जाऊन पुन्हा माघारी परतल्याचे दिसून आले.दरम्यान, सकाळी करूळ घाटात दिंडवणेवाडीजवळ दरड रस्त्यावर आली होती. कोसळलेल्या दरडीच्या ढिगाºयात दगडमातीसह झुडपांचा समावेश असल्याने जवळपास निम्म्याहून अधिक रस्ता बंद झाला होता. परंतु, एकेरी वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरडीचा ढिगारा हटवून दुपारी १२.३० च्या सुमारास घाटमार्ग पूर्णपणे खुला केला....तर काही दिवस मार्ग राहणार बंदगगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील पुराच्या पाण्याच्या पातळीत दुपारनंतर वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाचा जोर कायम राहिल्यास गगनबावडा-कोल्हापूर महामार्ग पुढील काही दिवस बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी आणि माल वाहतुकीला फटका बसणार आहे.