शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यांच्या विविध जातींची माहिती घेतली जाणून

By admin | Updated: May 26, 2015 00:57 IST

वेंगुर्ला फळ संशोधनाला भेट : निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शनिवारी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली. या भेटीच्यावेळी त्यांनी संशोधन केंद्रामार्फत निर्माण केलेल्या रत्ना, सिंधू, सुवर्णा, कोकण राजा तसेच कोकण सम्राट या आंबा जातींची माहिती घेतली. संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. एन. सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. या संशोधन केंद्रावर प्रथमच परदेशी आंबा जातीशी संकर करून कोकण सम्राट ही आंबा जात निर्माण केल्याबद्दल सहारिया यांनी येथील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी स्वयंरोजगार निर्मितीच्या दृष्टीने येथील चार प्रयोगशाळांमार्फत घेतलेल्या प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी येथील चार प्रयोगशाळांना भेट दिली. पी. एस. तल्ला यांनी चारही प्रयोगशाळांबाबत माहिती दिली. तसेच सहारिया यांनी येथील प्रयोगशाळेत उत्पादित के लेल्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची पाहणी केली. येथे लागवड केलेल्या अमेरिका, आॅस्ट्रेलिया व इस्रायल या देशातील आंबा जातीची त्यांनी माहिती घेतली. काजू प्रक्षेत्रावरील भेटीच्या दरम्यान डॉ. आर. सी. गजभिये यांनी त्यांना येथील विविध काजूच्या जातीविषयी माहिती दिली. यावेळी केंद्राच्या संशोधन कार्यात सातत्य राखावे, असे आवाहन सहारिया यांनी केले. यावेळी सहारिया यांच्यासोबत सावंतवाडी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. एन. सावंत, ए. वाय. मुंज, वैशाली झोटे, पी. एम. तल्ला, एस. एस. भुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)