शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खेड - दापोली राष्ट्रवादीकडे ?.. राजापूर काँग्रेसकडे : गुहागर महायुतीत विघ्न

By admin | Updated: August 29, 2014 23:11 IST

गुहागरवरून वादंग होण्याची शक्यता

खाडीपट्टा : विधानसभा निवडणुकीला दोन महिने अवधी असतानाच उमेदवार निवड प्रतिक्रियेला चांगलीच गती आली आहे. पक्षांतर्गत जागा वाटप व उमेदवार निवड प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असे संकेत मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ राजापूर मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसकडे राहणार असून, दापोली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जाणार आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी जिल्ह्यात एकत्र निवडणुका लढवत असून, उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटपाच्या अदलाबदलीत जिल्ह्यातील एक जागा काँग्रेसकडून मिळविण्यात यशस्वी झाली आहे. दापोली हा परंपरागत काँग्रेसकडे असलेला मतदार संघ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जिल्ह्यात केवळ राजापूर मतदार संघातून लढताना दिसणार आहे.जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर व दापोली हे पाच मतदारसंघ आहेत. यापैकी सध्या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी, तर तीन मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.जिल्ह्यात शिवसेना - भाजप युतीकडून राजापूर, चिपळूण, दापोली व गुहागर हे मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असून, रत्नागिरी मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला आहे. महायुतीमध्ये गुहागर मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपाला मिळावा, असा आग्रह धरला जात असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळल्याचे समजते. मागील निवडणुकीत गुहागर मतदारसंघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती, तर अपक्ष लढलेले विनय नातू तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. ही जागा शिवसेना सोडण्यास तयार नाही, अशी माहिती पुढे येत आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यात विशेषत: गुहागर मतदार संघात राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)गुहागरवरून वादंग होण्याची शक्यतागत विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदार संघ शिवसेनेला देण्यात आला. त्यामुळे तत्कालीन आमदार विनय नातू यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यात ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र त्यांनी पुन्हा एकदा प्रचाराला जोमाने सुरूवात केली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही त्यांची पाठराखण केली आहे. आता त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.