शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला खेळवतेय खंडाळा कॉलेजची वर्षा सावंत--यश रत्नकन्यांचे

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका

मेहरून नाकाडे -- रत्नागिरी  -कनिष्ठ महाविद्यालयासाठी तीन ते साडेतीन किलोमीटरचे अंतर पायी तुडवत, ऊन - पावसातच नव्हे; तर कडाक्याच्या थंडीतही सरावासाठी मैदानावर वेळेवर उपस्थित राहणे हे जणू नित्याचे आहे. जीव ओतून खेळाचा सराव केला जात असल्यानेच वर्षा मोहन सावंत हिने आपला विशेष ठसा उमटवला आहे. खेळातील चमकदार कामगिरीमुळे सी. के.नायडू क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट खेळामुळेच वर्षा सध्या महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.रत्नागिरी शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने जिल्हा पातळीवर नव्हे; तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी ग्रामीण भागातून येत असल्याने त्यांना लागणारे साहित्य व स्पर्धेसाठी जाण्या-येण्याचा लागणारा सर्व खर्च संस्थेने उचलला आहे. मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन या मुलींचे मनोबल उंचावते. वाटद मिरवणे केंद्रशाळेत वर्षाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक विद्यालय, वरवडे येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आई मनीषा सावंत, वडील मोहन देमाजी सावंत शेतकरी असून, घराची परिस्थिती बेताची, घरातून कोणतेही मार्गदर्शन नसताना क्रिकेटची आवड राजेश जाधव व अर्चना खानविलकर यांच्यामुळे निर्माण झाली. खेड्यातील खेळाडू असतानाही खेळातील बारकावे, छोट्या मोठ्या टीप्स राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी कशा उपयोगी पडतील, याबाबतची माहिती राजेश जाधव व अर्चना खानविलकर करतात. शिक्षकांवर पालकांचा विश्वास असल्यामुळे मुलींना स्पर्धेकरिता पाठवतात. आपली मुलगी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याचा वर्षाच्या वडिलांना अभिमान आहे.खेळताना खेळाडूचे लक्ष विजयाकडेच असते, किंबहुना ते असावे लागते. त्याप्रमाणे वर्षादेखील एकाग्र होऊन खेळ सादर करते. बेस्ट विकेट किपर (यष्टीरक्षक), उत्कृष्ट बॅट्समन, हाय स्कोर करून विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले आहे. सामान्य शेतकऱ्याची मुलगी असल्याने तिला अन्य खेळाडूंप्रमाणे फिटनेससाठी व्यायाम, खाणे याकडे फारसे प्राधान्य देणे शक्य नाही. घरातून बांधून दिलेला भाजीपोळीचा डबा शिवाय दररोज महाविद्यालयासाठी करावी लागणारी पायपीट या तिच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, तिच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम शाळेचे शिक्षक, संस्थाचालक करत आहेत.वर्षाप्रमाणेच या कनिष्ठ महाविद्यालयीन मुलींच्या संघाने क्रिकेटमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.या विद्यार्थिनींना राष्ट्रीय विशेष कोचच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या या संघाला चांगले प्रायोजक लाभले तर हा राष्ट्रीयस्तरावरील यशही खेचून आणण्याची ताकद या संघात आहे. परिस्थितीअभावी अनेक विद्यार्थिनींना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते किंबहुना खेळही सुटतो. परिणामी या विद्यार्थिनींचे नुकसान होते. या विद्यार्थिनींचा खेळातील सहभाग व यश राहिले तर नक्कीच त्यांची परिस्थिती बदलू शकते.विविध स्पर्धासी. के.नायडू क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटविविध शहरातील खेळकोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, पंजाब, दिल्ली, फिरोजाबाद, गुजरात, मथुरा, राजकोट, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, अमरावती.खेळातील यशबेस्ट विकेटकिपर (यष्टीरक्षक),उत्कृष्ट बॅट्समन हाय स्कोरक्रिकेट हाच श्वासखंडाळाहायस्कूल आणि महाविद्यालयात क्रिकेट शिकवणीसाठी क्रीडाशिक्षक राजेश जाधव आणि अर्चना खानविलकर मेहनत घेतात. ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू घडवण्याचे काम येथे सुरु आहे. अनेक समस्या पाचवीला पूजलेल्या असतानाही ज्ञानदाता गुरु आणि ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थिनी दोन्हीही कसोटीला उतरून क्रिकेट खेळतात. जणू क्रिकेट हाच त्यांचा श्वास आहे.