शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे हे काँग्रेसचेच पाप

By admin | Updated: September 10, 2016 00:37 IST

अतुल काळसेकर : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भाजपने बुजविले

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे हे काँग्रेस शासनाचेच पाप आहे. त्यांच्याच काळात महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आता ही स्थिती उद्भवली आहे. मात्र, असे असतानाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने फक्त बॅनरबाजी केली. खड्डे बुजविण्याच्या कामाचा पाठपुरावा केला नाही, अशी टीका करतानाच भाजपने या कामाचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देऊन गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवून भाविकांना दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतुल काळसेकर म्हणाले, काँग्रेस आघाडी शासनकाळात महामार्गाचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे होते. त्याला भाजप शासन जबाबदार असल्याचे सांगत काँग्रेसकडून बॅनरबाजी करीत टीका करण्यात आली होती. मात्र, बॅनरवर असलेले खड्डे हे महामार्गावरील नव्हते.भाजपने या खड्ड्यांबाबत पाठपुरावा केला. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले. त्यांनी कोकणात प्रथमच मोहीम हाती घेऊन गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनीही कार्यतत्परता दाखवत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवून भाविकांना दिलासा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे.१२ आॅगस्ट रोजी मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मागणीनुसार बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी नेते यावेळी उपस्थित होते. या बैठकीत महामार्गाच्या सद्य:स्थितीबाबत मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते.मात्र, जोरदार पाऊस पडत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचे काम अपूर्ण राहिले होते. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी चार टप्पे करण्यात आले होते. त्यातील जानवली पूल ते झाराप तिठा या टप्प्याच्या कामावर देखरख ठेवण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती. तेथील कामाचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून २९ आॅगस्ट रोजी मी तो मंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला होता. त्यामुळे ३0 आॅगस्ट रोजी अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी माहिती व प्रत्यक्ष स्थिती याबाबत मंत्र्यांना ताळमेळ घालता आला.त्यानंतर अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या सूचनांनुसार काम करून खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे भाविकांचा त्रास कमी झाला, असेही अतुल काळसेकर यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)महामार्गावर कारपेट करण्याची मागणी !मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी १८000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा मार्ग होण्यासाठी दोन वर्षे निश्चितच लागणार आहेत. त्यामुळे या कालावधीपूर्वी या रस्त्यावर डांबराचे कारपेट करण्यात यावे, अशी मागणी आम्ही सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे केली आहे. या मागणीला त्यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याचे अतुल काळसेकर यांनी यावेळी सांगितले.