शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सावंतवाडीत केसरकरांचे वर्चस्व

By admin | Updated: October 19, 2014 22:26 IST

शिवसेना कार्यकर्त्यांनी केला विजयोत्सव

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी तब्बल ४१ हजार १९२ मतांचे मताधिक्य मिळवित दणदणीत विजय मिळविला. दीपक केसरकर यांनी विक्रमी ७0 हजार ९0२ मते मिळविली. या मदरासंघात भाजपाचे राजन तेली हे २९ हजार ७१0 मते मिळवून दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत गावडे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. या मतदारसंघात पंतप्रधान मोदी व काँग्रेस नेते नारायण राणे यापैकी कोणाचाच प्रभाव दिसला नाही. केसरकरांना विजयी घोषित केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.येथील जिमखाना मैदानावर सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. मतमोजणीच्या एकूण २२ फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीपासूनच सेनेचे दीपक केसरकर हे आघाडीवर राहिले. पाचव्या फेरीनंतर दीपक केसरकर यांचे मताधिक्य वाढल्याने भाजपाचे राजन तेली यांनी मतमोजणी कक्षातून बाहेर जाणे पसंत केले. तर त्यानंतर सुरेश दळवीही कक्षातून बाहेर पडले. त्यानंतर काँग्रेसचे चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दहाव्या फेरीनंतर कक्षाबाहेर पडले. पहिल्या टप्प्यात वेंगुर्ले तालुक्याची मतमोजणी करण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यात केसरकर यांनी २३ हजार ९५९ मते मिळविली. तालुक्यात दुसऱ्या स्थानी राहिलेल्या भाजपाच्या राजन तेली यांनी ८ हजार ३९१ मते मिळविली. काँग्रेसचे बाळा गावडे यांनी ७ हजार ८४४, मनसेच्या उपरकरांना यांना १ हजार ९0४ तर राष्ट्रवादीचे सुरेश दळवी यांना केवळ १ हजार ३५२ मते मिळाली. सावंतवाडी तालुक्यात केसरकर यांनी सर्वाधिक ३८ हजार ६९३ मते मिळविली. तेली यांनी १४ हजार ५९३, गावडे यांनी १४ हजार ६३१, दळवी यांनी २ हजार ७३५ तर उपरकर यांनी ३ हजार ९४ मते मिळविली. दोडामार्ग तालुक्यातही केसरकरांनी मताधिक्य कायम राखले. याठिकाणी त्यांनी ६ हजार ६७५ मते मिळविली. राजन तेली यांनी ४ हजार ९३५, बाळा गावडे यांनी १ हजार ९४0, परशुराम उपरकर यांना केवळ ८२७ मते तर स्थानिक उमेदवार असलेल्या सुरेश दळवी यांना केवळ ३ हजार ६३४ मते मिळाली. या निवडणुकीत १ हजार ५१५ मतदारांनी वरील उमेदवारांना नकाराधिकार मतदान केले. ५४१ पोस्टल मतांपैकी दीपक केसरकर यांना ३७0 मते मिळाली. केसरकरांनी १८ व्या फेरीअखेर मतमोजणी कक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचासोबत त्यांच्या पत्नी पल्लवी, मुलगी सोनाली उपस्थित होती. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. केसरकर यांच्या विजयानंतर सावंतवाडी शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढत विजयोत्सव साजरा केला. कोणत्या कारणामुळेपक्ष जिंकलादीपक केसरकरांनी स्वच्छ चारित्र्य व नम्रतेच्या जोरावर वेगळी प्रतिमा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निर्माण केली. कठीण प्रसंगात कार्यकर्त्यांना साथ दिल्याने त्यांना मताधिक्य मिळविणे सोपे झाले.सावंतवाडी मतदारसंघात पंचरंगी निवडणूक झाली. राष्ट्रवादीचे सुरेश दळवी वगळता इतर उमेदवार मतदार संघाबाहेरील आयात उमेदवार होते. परिणामत: मतदारांचा कल स्थानिक उमेदवाराकडेच असल्याने याचा फायदाही केसरकरांना झाला व त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. दीपक केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सेनेची ताकद या मतदारसंघात वाढली. परंतु त्याचबरोबर सेनेच्या भगव्या झेंड्याखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज केसकरांना मिळाली. त्यांचे काही सहकारी सोडून गेले असताना सेनेचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात उरतले आणि सेनेची पारंपरिक मतेही त्यांनी मिळविली. ठळक वैशिष्ट्येसावंतवाडीतील मतदारसंघात निवडणुकीआधी झालेली पक्षांतरे ही केसरकरांसाठी जमेची बाजू ठरली. केसरकरांसोबत शिवसेनेत दाखल झालेले सुरेश दळवी यांना राष्ट्रवादीने तिकीटाचे आमिष दाखवत फोडले.