शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फिशमिलविरोधात केळूसकर आक्रमक

By admin | Updated: October 26, 2016 22:43 IST

कंपनीला दिलेला नाहरकत दाखला रद्द : ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांना बसविले जमिनीवर

वेंगुर्ले : केळूस ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आकाश फिशमिल अँड फिश आॅईल प्रा. लि. या कंपनीला ना हरकत दाखला देऊ नये, असा ठराव केळूस ग्रामसभेत घेण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीने आकाश फिशमिल अँड फिश आॅईल प्रा. लि. या कंपनीला दिलेला नाहरकत दाखला ग्रामसभेने रद्द केला. या विशेष ग्रामसभेत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना चक्क खुर्चीवरून खाली उतरवून ग्रामसभेत ग्रामस्थांसोबत खाली बसविले.वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावात ग्रामपंचायत हद्दीत एका उद्योजकाने ‘आकाश फिशमिल’ हा मत्स्य प्रक्रिया उद्योग सुरू केला असून, या कंपनीला केळूस ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला दिला होता. मात्र, कंपनी प्रशासनाने मत्स्य प्रक्रिया उद्योगातून निघणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था नीट न केल्याने परिसरातील लोकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. याबाबत ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रशासनाशी बोलून त्याबाबत कल्पना दिली होती. वारंवार कल्पना देऊनसुद्धा कंपनी प्रशासनाने त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, ग्रामपंचायतीनेही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वारंवार कंपनीकडे तसेच ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कंपनी व ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे ठरविले होते. त्यानुसार १८ आॅक्टोबर रोजी या प्रश्नावर दत्तात्रय ऊर्फ दादा राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा झाली. ही ग्रामसभा दुपारी असल्यामुळे व सध्या शेतीच्या कामांची घाईगडबड असल्यामुळे ३० ते ४० ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी केळूस ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विकास केळुसकर यांनी सभेची गणपूर्ती पूर्ण होत नसल्यामुळे सभा बरखास्त करण्यात येईल असे सांगितले. यामुळे उपस्थित ग्रामस्थ आक्रमक बनले. ग्रामसेवकांच्या या कायदेशीर असहकार्यावर उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसेवक, कंपनी प्रतिनिधी तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य गंभीर प्रश्नावर आयोजित केलेली विशेष ग्रामसभा बरखास्त करीत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी १५ ते २० मिनिटांत गावातील इतर ग्रामस्थांना याची कल्पना देऊन त्यांना ग्रामसभेच्या ठिकाणी बोलावून घेतले. परिणामी सभेसाठी लागणारी गणपूर्ती झाली.ग्रामसेवक, सरपंच विकास केळुसकर, सरपंच स्मिता राऊळ, उपसरपंच योगेश शेट्ये तसेच सदस्य ग्रामसभेत असहकार्याचे धोरण घेत असल्याने २०० ते २५० ग्रामस्थांनी याबाबत संबंधितांना जाब विचारला. ‘आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे, त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक आहात. त्यामुळे तुम्ही ग्रामस्थांसोबत राहत नसाल, तर आताच्या आता खुर्च्या खाली करा,’ असे ग्रामस्थांनी त्यांना सुनावले. यामुळे ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंच, तसेच सदस्य बसलेल्या खुर्च्या काढून घेऊन त्या सभागृहाबाहेर नेऊन ठेवण्यात आल्या. यावेळी या सर्वांनाच ग्रामस्थांसोबत जमिनीवर बसवून सभेचे कामकाज चालू केले. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कंपनी प्रतिनिधीसह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामस्थांनी सदर कंपनीकडून सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था केली नसल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कंपनीस दिलेला नाहरकत दाखला रद्द करण्याचा ठराव घेतला. अखेर ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी ग्रामस्थांसमोर नमते घेत ठराव मान्य केला. केळूस ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ग्रामसेवक विकास केळुसकर, सरपंच स्मिता राऊळ, उपसरपंच योगेश शेट्ये सदस्य यांना जमिनीवर बसवून ही ग्रामसभा घेण्यात आली. (वार्ताहर)अन् केली जुळवाजुळवशेतीच्या कामांमुळे सभेला ४० ग्रामस्थांची उपस्थिती होती. गणपूर्ती होत नसल्याने ग्रामसेवकाने सभा बरखास्तीचा घाट घातला. मात्र, ग्रामस्थांनी त्वरित नागरिकांची जुळवाजुळव करत गणपूर्ती केली.अन् सभेचे कामकाज जमिनीवरूनग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या खुर्च्या काढून घेऊन त्या सभागृहाबाहेर नेऊन ठेवल्या व त्यांना ग्रामस्थांसोबत जमिनीवर बसवून सभेचे कामकाज चालू केले.