शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

केसरकर-राणे आज आमने-सामने

By admin | Updated: October 14, 2016 00:01 IST

नियोजन समितीची बैठक : संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

सिंधुुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक आज, शुक्रवारी होत असून, त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार नारायण राणे आमने-सामने येत असल्याने या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक दुपारी ३ वा. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन सभागृहात होणार आहे. या बैठकीला अडीच वर्षांनंतर विधान परिषदेतील आमदार नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. बैठकीत विविध विकासकामांच्या मुद्द्यावरून केसरकर व राणे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच या बैठकीला महत्त्व आहे. जिल्हा नियोजन समितीची यापूर्वीची सभा २१ जानेवारीला केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या सभेतही वादळी चर्चा झाली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी काही सदस्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित केले होते. त्या गदारोळातच सभेचे कामकाज आटोपण्यात आले होते. जानेवारीत सभा झाल्यानंतर नियमानुसार त्यानंतरची सभा तीन किंवा सहा महिन्यांनंतर घेणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या सभेला नऊ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत १३० कोटी रुपयांच्या जमाखर्चांचा आढावा, जुन्या कामांना मंजुरी देणे, कामांचे पुनर्नियोजन करणे, आदी विषय चर्चेला येणार आहेत. विषयपत्रिकेत जुन्या कामांना मंजुरी देणे हा विषय कळीचा मुद्दा ठरू शकतो. कारण जानेवारीमध्ये पार पडलेल्या बैठकीत गदारोळातच काही कामे सुचविण्यात आली होती. त्या कामांना या बैठकीमध्ये सर्व सदस्यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तरच त्या कामांना मान्यता मिळणार आहे. (प्रतिनिधी) केसरकर यांच्या ‘त्या’ उद्गाराची होणार आठवण राणे ज्यावेळी पालकमंत्री होते, त्यावेळी त्यांच्यात व केसरकर यांच्यात शाब्दिक वादही व्हायचे. त्यावेळी ‘मी ही एक दिवस पालकमंत्री असेन’, असे उद्गार केसरकर यांनी तत्कालीन नियोजन सभेत काढले होते. त्यामुळे या बैठकीला नारायण राणे उपस्थित राहिल्यास केसरकर यांनी काढलेल्या त्या उद्गाराची निश्चितच आठवण येणार आहे. विकासकामांवरून राणे पालकमंत्र्यांवर कडाडून टीका करीत आहेत.