शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पथनाट्यामध्ये कट्टा, साळगाव प्रथम

By admin | Updated: December 25, 2015 00:05 IST

उडान महोत्सवानिमित्त स्पर्धा : जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांचा सहभाग

वैभववाडी : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने आयोजित ‘उडान महोत्सवा’च्या पथनाट्य स्पर्धेत डॉ. दादासाहेब वराडकर महाविद्यालय कट्टा-मालवण व जयहिंद कॉलेज साळगाव-कुडाळ तर पोस्टर्स स्पर्धेत आचरा व्यवस्थापन कॉलेज व कणकवली कॉलेजने बाजी मारली. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात झालेल्या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांचा सहभाग होता.विविध प्रकल्पांवर आधारित १२ पथनाट्यांचे सादरीकरण व २५ पोस्टर्सचे प्रदर्शन करण्यात आले होते. उडान महोत्सवाचा निकाल पुढीलप्रमाणे- पथनाट्य स्पर्धा : प्रथम दादासाहेब वराडकर महाविद्यालय कट्टा-मालवण व जयहिंद कॉलेज साळगाव कुडाळ, द्वितीय श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी व संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, तृतीय आचरा व्यवस्थापन महाविद्यालय आचरा, व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ व दादासाहेब तिरोडकर महाविद्यालय पणदूर, उत्तेजनार्थ- रावसाहेब गोगटे-वाळके कॉलेज बांदा, देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज सावंतवाडी, कणकवली कॉलेज कणकवली, प्रमोद रवींद्र्र धुरी अध्यापक महाविद्यालय साळगाव यांनी पथनाट्य स्पर्धेत यश मिळवले. उडान महोत्सवात उल्लेखनीय यश मिळवलेल्या महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. कुणाल जाधव, उपप्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, डॉ. शिवाजीराव आकेळकर, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. सी. डी. भेंकी, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. आर. डी. देसाई आदी उपस्थित होते.अनिल चव्हाण, अनिल काटकर यांनी पथनाट्यांचे तर एस. आर. चोरगे, योगेश रावराणे यांनी पोस्टर्स स्पर्धेचे परिक्षण केले. (प्रतिनिधी) पोस्टर स्पर्धा : आचरा व्यवस्थापन कॉलेज प्रथमपोस्टर्स स्पर्धा : प्रथम आचरा व्यवस्थापन कॉलेज आचरा, कणकवली कॉलेज कणकवली, द्वितीय श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, फोंडाघाट कॉलेज, तृतीय डॉ. दादासाहेब वराडकर महाविद्यालय कट्टा -मालवण, दादासाहेब तिरोडकर महाविद्यालय - पणदूर, उत्तेजनार्थ आचरा व्यवस्थापन कॉलेज - आचरा, फोंडाघाट कॉलेज - फोंडाघाट, तोंडवली अद्यापक विद्यालय - तोंडवली, बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ले यांनी यश मिळवले.