शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

‘कस्तुरीरंगन’ अहवालाचा केंद्र फेरविचार करणार : राऊत

By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST

इंदापूर ते झारापपर्यंत एकही टोल असणार नाही

सावंतवाडी : केंद्रशासन कस्तुरीरंगन अहवालाचा फेरविचार करणार असून, त्याबाबतचा महाराष्ट्र शासनाकडे अहवाल मागितला आहे. पण शासनाने हा अहवाल अद्याप दिला नसल्याने पुढील कारवाई केंद्र सरकारने केली नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजीन लोबो, संपर्कप्रमुख शैलेश परब, रूपेश राऊळ, एकनाथ नारोजी, शब्बीर मणियार यावेळी उपस्थित होते. राऊत म्हणाले, कस्तुरीरंगन अहवालाप्रमाणे आता कारवाई सर्वत्र सुरू झाली आहे. मात्र, या कारवाईस विरोध आहे. केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाबाबत फेरविचार करण्याचे ठरविले असून, त्यांनी तशाप्रकारे महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर अहवाल मागितला. पण महाराष्ट्राने हा अहवाल केंद्राला दिला नाही. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तत्कालीन पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याकडून माहिती घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच माळीण गावात जी दुर्घटना घडली. त्यानंतर केंद्र सरकारने डोंगराच्या पायथ्याच्या गावांचा सर्व्हे सुरू केला आहे. येथील कळणे व साटेली मायनिंगला तीव्र विरोध असून तेथील ग्रामस्थांच्या मागे कायम उभे राहू, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)इंदापूर ते झारापपर्यंत एकही टोल असणार नाहीइंदापूरपासून झारापपर्यंतच्या महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करा, असे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यानुसार राजापूर पर्यंतचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता त्यापुढील टप्प्याचे भूसंपादन लवकरात लवकर सुरू केले जाईल. या रस्त्यावर इंदापूरपर्यंत एक टोल असेल मात्र, इंदापूरनंतर झारापपर्यंत एकही टोल असणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. तसे नव्या नियमात नोंद आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली आहे. इंदापूर पर्यंतचा रस्ता हा बीओटी तत्त्वावर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.-माजी आमदार परशुराम उपरकर यांना आपण फक्त सज्जन असल्याचा भास होतो. त्यांची ही चिवचिव फुकटची आहे, अशी टीका यावेळी खासदार राऊत यांनी केली आहे.