शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

करुळ घाटात एस.टी.कोसळली

By admin | Updated: June 8, 2014 01:13 IST

आपत्कालीन प्रात्यक्षिक : प्रशासकीय यंत्रणेची उडाली झोप

वैभववाडी : करुळ घाटातील दरीत एस.टी. कोसळण्याच्या वृत्ताने प्रशासकीय यंत्रणेसह तालुकावासीयांची अक्षरश: झोप उडाली. बांधकाम, आरोग्य, पोलीस, पंचायत समिती कृषी आदी विभागाची पथके घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पोहोचल्यावर ते आपत्कालीन प्रात्यक्षिक असल्याचे स्पष्ट होताच साऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करुळ घाटात एस.टी. कोसळल्याचा दूरध्वनी तहसीलमधून पोलिसांना गेला. त्यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण तालुक्यात पसरले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचीही तारांबळ उडाली. प्रत्येक विभागाचे पथक तातडीने घाटाकडे रवाना झाले. मात्र अपवाद होता एस.टी. विभागाचा. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लाड कर्मचाऱ्यांसह दोरखंड घेऊन घाटात पोहोचले. त्या पाठोपाठ ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी गेली. सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता मुकुंद कचरे, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, मंडल कृषी अधिकारी शरच्चंद्र नानिवडेकर तसेच सभापती नासीर काझी, उपसभापती बंड्या मांजरेकर आदी घाटात पोहोचले. त्यावेळी नियोजित घटनास्थळी उपस्थित तहसीलदार विजय जाधव यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे घटनास्थळी जमलेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. घाटात रुग्णवाहिकेसह शासकीय वाहनांची गर्दी झाल्याने घाटातून प्रवास करणाऱ्यांना नेमके काय घडले याचा उलघडा होत नव्हता. त्यापैकी काही जण घाट मार्गात जागोजागी थांबून विचारणा करत होते. आपत्कालीन प्रात्यक्षिकामुळे सगळ्यांचा पोपट झाला. परंतु आज दिसलेली सतर्कता खऱ्याखुऱ्या आपत्तीवेळी उपयोगात येईल का? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. (प्रतिनिधी)