नीलेश मोरजकर - बांदा शेर्ले तेरेखोल नदीपात्रावर शेर्ले ग्रामस्थांनी श्रमदानाने बंधारा बांधण्यास प्रारंभ केल्याने या बंधाऱ्यामुळे शेर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांची पायपीट वाचणार आहे. गेल्या कित्येक वर्षांची मागणी असलेल्या पुलाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेत या नदीपात्रावर श्रमदानातून बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संतोष तारी यांनी याठिकाणी होडीसेवा सुरू केली. होडीसेवेमुळे ग्रामस्थांची इन्सुली मार्गे बांद्यात होणारी पायपीट थांबली. मात्र, ग्रामस्थांना पावसाळ्यानंतर अद्यापही इन्सुली आरटीओ नाका मार्गे बांदा येथे यावे लागते.यावेळी सरपंच उदय धुरी, माजी सरपंच दयानंद धुरी, आना धुरी, लक्ष्मण जाधव, दीपक गोवेकर, शाम सावंत, रवी आमडोसकर, बाळा धुरी, महादेव जाधव, लाडोजी जाधव यांच्यासह शेर्ले ग्रामस्थांनी बंधारा उभारणीच्या कामात सहभाग घेतला. जीव मुठीत घेऊन प्रवासशेर्ले-बांदा नदीतीरावर बारमाही वाहतूक सुरू असते. पावसाळ्यात पुराचे पाणी असतानाही शेर्लेवासीय होडीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. यामध्ये शेर्ले परिसरातून बांद्यात येणाऱ्या शाळकरी व महाविद्यालयीन मुलांचा देखील समावेश असतो. या मार्गावर वाहतूक जास्त असल्याने या नदीपात्रावर पुलाची मागणी होत आहे. मात्र, प्रत्येकवेळी केवळ आश्वासनेच मिळत असल्याने हा नदीपात्रावरील पूल हे प्रतीक्षेतच आहे.
पुलाच्या मागणीला केराची टोपली
By admin | Updated: December 26, 2014 00:20 IST