शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

सिंधुदुर्ग : नागवे येथील माळरानावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, रोख रक्कमेसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By सुधीर राणे | Updated: May 26, 2023 14:11 IST

जुगार खेळणाऱ्या बारा जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कणकवली(सिंधुदुर्ग): कणकवली तालुक्यातील नागवे येथील माळरानावर चाललेल्या जुगार अड्ड्यावर  गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अंधाराचा फायदा घेत जुगार खेळणारे काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर पळताना काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.या धाडीत जुगाराचे साहित्य, चार चाकी आणि दुचाकी गाड्यांसह,मोबाईल व इतर साहित्य असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तर  जुगार खेळणाऱ्या बारा जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कणकवली पोलिसांना नागवे माळरानावर जुगार अड्डा सूरु असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली.  यावेळी तिथे एलईडी बल्बच्या उजेडात सतरंजीवर बसून पत्यांच्या सहाय्याने जुगार खेळला जात होता. जुगार खेळण्यासाठी  तिथे कणकवलीसह मालवण, सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातील व्यक्ती आल्या  होत्या. त्यातील काहीजण पळून जाण्याचा यशस्वी झाले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांच्या या कारवाईत जयवंत आत्माराम बाईत, ( ४९, रा. कणकवली, तेलीआळी) सिध्देश भास्कर ठाकुर, ( ३९ , रा. कलमठ,लांजेवाडी)संतोष बाळकृष्ण कुडतरकर,(  ५०, रा. माणगाव बाजारपेठ, ता. कुडाळ), विशाल वासुदेव सावंत ( ४५, रा. सावंतवाडी, वैश्यवाडा), केतन रावजी ढोलम,( ३५ , रा. कोळब आडारीवाडी, ता. मालवण), महेश गंगाधर जोगी ( ३२, रा. मालवण बाजारपेठ), कुलराज भगवान बांदेकर (२२, रा. मालवण, जोशीवाडी), शुभम कृष्णकांत मिठबावकर( २२, रा. मालवण हडी), रोहन जितेंद्र वाळके(२९ , रा. मालवण, देऊळवाडा), हेमराज प्रकाश सावजी ( ३०, रा. वायरी,भुतनाथ, ता. मालवण), विनायक शशिकांत शिर्के (रा. कलमठ, कणकवली), साहील उमेश आचरेकर (२१ ,मालवण,दांडी)यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी तक्रार नोंदविली आहे. 

या कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक बापू खरात,विनायक चव्हाण, हवालदार पांडुरंग पांढरे, बारड,होमगार्ड राणे,गोसावी,सकपाळ, एकावडे आदी सहभागी झाले होते.   वाहनांसह २१लाख २१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त!

 या धाडीत १ लाख ७ हजार रुपये किमतीचे मोबाईल,२४ हजार ३७०रुपये रोख रक्कम असा १ लाख ३१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर १९ लाख ९० हजार रुपये किमतीच्या तीन चार चाकी व तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. वाहनांसह या मुद्देमालाची एकूण किंमत २१लाख २१ हजार ३७० रुपये आहे.