शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली शहर बाजारपेठ फुलली

By admin | Updated: September 4, 2016 23:27 IST

कणकवली शहरात रविवारी गणेशोत्सवाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. तर महामार्गावर वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या.

कणकवली : कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला सोमवारी प्रारंभ होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरु असून मुंबईकर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रविवारी श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी लगबग सुरु होती. तर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. त्यामुळे रस्तेही वाहनांनी फुलून गेले होते. कोकणात गणेशोत्सव म्हटला की सर्वांचाच आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. महागाई कितीही वाढली तरी काटकसर करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा विविधप्रकारे केली जाते. लहानथोर तयारीत गुंतलेले असतात. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की, तयारीची कामे वेग घेत असतात. घराला रंगरंगोटी केली जाते. काहीजणांची ही तयारी तर अगदी गणपती घरात विराजमान होईपर्यंत सुरु असते. यावर्षीही शुक्ररवारपासून सिंधुदुर्गात मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे रस्ते वाहनांनी फुलून गेले होते. बाजारपेठाही गजबजू लागल्या होत्या. शनिवारी तर कणकवली शहरात बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रविवारीही अशीच काहीशी स्थिती होती. पूजेचे तसेच नैवेद्याचे साहित्य, गणरायाच्या अंगावरील वस्त्रालंकार, आरास करण्यासाठी लागणारे साहित्य अशा विविध वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. त्यातच रविवारी हरितालिका असल्याने शहाळी आणि विविध फळे खरेदी करण्यासाठीही गर्दी दिसून येत होती. विविध भाज्यानांही जास्त मागणी होती. विजेवर चालणारी तोरणे, गौरीसाठी लागणारी सुपे असे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात भाविक गुंतले होते. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा शहाळ्यांचे ढीग रचून त्यांची विक्री करण्यात विक्रेते गुंतले होते. फुले तसेच धूप, अगरबत्ती, कापूर अशा गणेशाच्या पूजेसाठीच्या साहित्याचे स्टॉल्स रस्त्यावरच थाटण्यात आले होते. याठिकाणीही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.(प्रतिनिधी) वाहतूक कोंडीचा फटका : वाहतूक पोलिस पथक तैनात गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी आलेल्या मुंबईकर मंडळींनी रेल्वे, एस. टी. बरोबरच लक्झरी तसेच खासगी वाहनांना पसंती दिली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह अंतर्गत रस्तेही वाहनांनी फुलून गेले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचे पथक कार्यरत होते. रविवारी सकाळपासूनच अधिकाऱ्यांसह पोलिस पथके कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नरत होती. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष गणेश चतुर्थीदिवशी होणारी गडबड टाळण्यासाठी अनेक भाविकांनी रविवारीच श्री गणेशमूर्ती आपल्या घरी आणल्या. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ चा जयघोष करीत वाद्यांच्या गजरात गणेशमूर्ती घरी नेताना अनेक भाविक दिसत होते. या गणरायाला पाहून अनेकांचे हात नमस्काराच्या मुद्रेत जुळत होते.