शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत मुलगा बुडताना वाचला

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

गणेश विसर्जनासाठी सुरक्षिततेची व्यवस्था करणे गरजेचे

कणकवली : गुरूवारी गौरी गणपतींचे शहरात ठिकठिकाणी विसर्जन होणार आहे. ग्रामीण भागात विसर्जनासाठी स्थानिक मंडळीच हातभार लावतात. शहरात गणेश विसर्जनासाठी हौशी मुले आपला जीव धोक्यात घालत आहेत. नगरपंचायतीकडून विसर्जनाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पाचव्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गणपती सान्यावर जानवली नदीत उतरलेला सुमारे दहा वर्षे वयाचा मुलगा बुडता बुडता वाचला. मूर्ती विसर्जित करून परतताना तो बुडताना काहींनी पाहिले आणि आरडाओरडा केला. त्यावेळी आजूबाजूला विसर्जन करत असलेल्या इतर मुलांनी त्याला पाण्याबाहेर काढले. यावेळी कणकवली स्थानकाचे पोलीसही बंदोबस्तासाठी घटनास्थळी उपस्थित होते. गणेश विसर्जनासाठी नगरपंचायतीकडून कोणतीही व्यवस्था न केल्याने हौशी पोहणारे विसर्जनासाठी पाण्यात उतरतात. या बदल्यात त्यांना गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्यांकडून पैसेही मिळतात. नगरपंचायतीने गणपती साना आणि हायमास्टची उभारणी केली आहे. मात्र, पाचव्या दिवशी मूर्ती विसर्जनावेळी गणपती सान्यावर हायमास्ट दिवेही लागलेले नव्हते. शहरात गणपती साना, मराठा मंडळ, कनकनगर बंधाऱ्यानजीक, टेंबवाडी आदी ठिकाणी जानवली आणि गडनदी पात्रात गणेश विसर्जन केले जाते. मात्र, कोणत्याही ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. नगरपंचायतीकडून विसर्जनस्थळी किमान एक कर्मचारी विसर्जनाच्या व्यवस्थापनासाठी ठेवणे गरजेचे आहे. महसूल विभागाकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी लाईफ जॅकेटस आणि बोट उपलब्ध आहे. या साधनांचा गणेश विसर्जनावेळी वापर केला जाऊ शकतो. अनंत चतुर्दशीला शहरातील गणेश विसर्जन मोठ्या संख्येने केले जाते. त्यावेळी फक्त सुरक्षा न पुरवता दीड, पाच, सात दिवसांच्या गणेश विसर्जनासाठीही सुरक्षा व्यवस्था पुरवणे तेवढेच गरजेचे आहे. (प्रतिनिधी)