शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोळंबला ‘डिजिटल केंद्राचा’ मान

By admin | Updated: December 21, 2016 22:38 IST

दोन शाळांचे आयएसओ नामांकनासाठी प्रस्ताव: मालवण पंचायत समितीकडून सत्कार

मालवण : कोळंब केंद्रातील जिल्हा परिषदेच्या अकराही शाळा डिजिटल बनल्या असून, कोळंब हे जिल्ह्यातील पहिले डिजिटल केंद्र बनले आहे. या शाळा डिजिटल बनविण्यासाठी माजी सभापती उदय परब व गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पुढाकार घेतला होता. कोळंब केंद्राच्या या यशाबद्दल मालवण पंचायत समितीच्यावतीने कोळंब केंद्रप्रमुख अन्वर शेख, शिक्षक सरोजकुमार जैवळ, उदय परब यांचा सभापती हिमाली अमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती छोटू ठाकूर, सदस्य प्रसाद मोरजकर, देवानंद चिंदरकर, उदय परब, राजेंद्र प्रभुदेसाई, भाग्यता वायंगणकर, चित्रा दळवी, श्रद्धा केळुसकर, सीमा परुळेकर, सुजला तांबे, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, वसंत महाले, उदय दीक्षित, विजय जाधव, आदी उपस्थित होते.पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शाळांना संगणक उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. माजी सभापती उदय परब यांनी स्वनिधीचा वापर करून डिजिटल शाळा बनविण्यासाठी पुढाकार घेतला, तर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वाधिक ३८ शाळा डिजिटल झाल्या. यात कोळंब केंद्राने जिल्ह्यातील पहिले डिजिटल केंद्र बनण्याचा मान मिळविला आहे. याबाबत परब यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल झाल्या याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)शाळांची झेप कोळंब केंद्रातील मधली रेवंडी शाळेला सर्वप्रथम आयएसओ मानांकन मिळाले होते. शिक्षकांची मेहनत व पंचायत समितीच्या सहकार्याने हे यश मिळविले होते. जिल्ह्यात पाच ते दहा शाळा आयएसओ मानांकन असून, नुकतेच घुमडे व काळसे-बागवाडा या दोन शाळांचे आयएसओ नामांकनासाठी प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मुळीक यांनी दिली.