शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कदम यांचा आज भाजप प्रवेश

By admin | Updated: January 31, 2017 23:52 IST

बाळ मानेंची माहिती; चिपळुणातील पाच नगरसेवकही प्रवेश करणार

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम आज, बुधवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत चिपळूणमधील राष्ट्रवादीचे ५ नगरसेवक तसेच रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील त्यांचे कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली.जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी माने यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली. भाजप उमेदवारांच्या यादीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेकांचा समावेश आहे. भाजपमध्ये येण्यास अन्य पक्षांतील अनेक मातब्बर नेते उत्सुक आहेत. येत्या आठवड्यात त्यांच्या भाजपमधील प्रवेशाची शक्यता माने यांनी व्यक्त केली. चिपळूण नगर परिषद निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये जे राजकारण झाले त्याला कंटाळून रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँगे्रसला रामराम केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही जाहीर केले. मात्र, कदम यांचा भाजप प्रवेश लांबला होता. (प्रतिनिधी)जनतेने नाकारले हे अर्धसत्य...चिपळूण नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे पॅनेल उभे केल्यानंतर केवळ ५ नगरसेवक निवडून आले. हा रमेश कदम यांचा पराभवच होता. जनतेने नाकारलेल्या कदमांना भाजपने कसे काय स्वीकारले, असे विचारता माने म्हणाले, जनतेने नाकारले हे अर्धसत्य आहे. चिपळुणच्या १३ प्रभागांतील मतदानाची आकडेवारी पाहता हजारो मतदार त्यांच्या पाठीशी असल्याचे पुढे आले आहे. मतांचे विभाजन झाल्याने त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. पराभव झाला म्हणून कोणी राजकारणातून संपला असे होत नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.