शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडली तर फक्त एक फोन करा

By admin | Updated: October 30, 2015 23:19 IST

प्रमोद मकेश्वर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीतर्फे चर्चासत्र

चिपळूण : आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. कोणतेही काम लाच दिल्याखेरीज होत नाही, असा सर्वसामान्यांनी समज करुन घेतला आहे. याचाच फायदा काही सरकारी कर्मचारी घेत आहेत. सरकारच्या योजना आपल्या भल्यासाठी असतात मग लाच कशासाठी द्यायची, असा प्रश्न उपस्थित करुन कामं अडली, गरज पडली तर फक्त एक फोन करा. आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर असू. आपले नाव गुप्त ठेवले जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश गुरव यांनी सांगितले. चिपळूण पोलीस ठाण्याच्या बहुउद्देशीय सभागृहात गुरुवारी सकाळी पोलीसपाटील, पोलीसमित्र, प्रतिष्ठीत नागरिक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांचे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी लाच कशी व कशा प्रकारे घेतली जाते. त्यावर आपण नियंत्रण कसे आणू शकतो. याबाबतची सविस्तर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांनी दिली. तुम्ही समाजात घडणाऱ्या अशा गोष्टींबाबत ०२३५२-२२२८९३ या दूरध्वनी क्रमांकावर माहिती दिल्यास त्याची खातरजमा करुन गुन्हेगारावर कारवाई केली जाईल. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्याची काळजी नको, असा विश्वास गुरव यांनी दिला. आपल्या हक्कासाठी किंवा कुठलाही सरकारी दाखला लाच दिल्याशिवाय मिळत नाही. मात्र, दाखला मिळवणे हा आपला हक्क आहे, तो मिळवण्यासाठी आपण लाच का द्यायची? आपण जागरूक असू, तर लाच द्यायचा प्रश्नच उद्भवणार नाही. लाच देणे आणि एखाद्याकडून लाच घेणे हा गुन्हा आहे. याबाबत पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी माहिती दिली. यावेळी पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष दिलावर खडपोलकर, त्यांचे सर्व सहकारी, पोलीस मित्र, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या गावात व आपल्या भागात असे लाच घेण्याचे प्रकार निदर्शनास आले तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)लाच घेणे - देणे हे दोन्हीही सारखेच गुन्हे आहेत. लाचखोरी पूर्णत: नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ती पूर्णत: नष्ट होत नसल्याचे दिसत आहे. शासकीय कार्यालयाला लागलेली ही कीड असून, अनेक अधिकारी व कर्मचारी सापळ्यात अडकले आहेत. तरीदेखील लाचखोरीचे प्रकार घडत असल्याने लाचखोरी थांबणार कधी ?काम अडले, गरज पडली तर फोनवर काम. एसीबी हेल्पलाईनसाठी १०६४ टोल फ्री क्रमांक डायल करा. हक्क मिळवण्यासाठी लाच का? लाच देणे-घेणे हा गुन्हा आहे, याबाबत जनजागृती व्हायला हवी.जनतेचे प्रबोधन करण्याची गरज.