शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जानवलीत पिस्तुलातून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:14 IST

कणकवली : कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली येथे एका बिल्डरकडून फ्लॅटधारकाला ठार मारण्याची धमकी देत पिस्तुलातून गोळीबार करण्याची घटना ...

कणकवली : कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली येथे एका बिल्डरकडून फ्लॅटधारकाला ठार मारण्याची धमकी देत पिस्तुलातून गोळीबार करण्याची घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. बिल्डर आणि फ्लॅटधारकामध्ये असलेल्या बांधकामाच्या वादाची पार्श्वभूमी या घटनेमागे आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कणकवली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.फ्लॅटधारक तथा जानवली वाकडवाडी येथील साईसृष्टी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष किशोर अनंत दाभोलकर यांनी या घटनेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी बिल्डर सुभाष श्रीधर भोसले यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करीत आहे.या घटनेबाबत किशोर दाभोलकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते जानवली आदर्शनगर येथील साईसृष्टी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचे विरोधक सुभाष श्रीधर भोसले हे त्या सोसायटीचे बिल्डर आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी किशोर दाभोलकर यांनी ग्राहक मंचाकडे निकृष्ट बांधकाम करून आपली फसवणूक केली म्हणून सुभाष भोसले यांच्याविरोधात तक्रार केली होती.तसेच सोसायटीमार्फत २०१५ मध्ये सार्वजनिक सोयीसुविधा आणि अनधिकृत बांधकाम या कारणांसाठी दिवाणी न्यायालयात दावाही दाखल केला आहे. तेव्हापासून किशोर दाभोलकर व सुभाष भोसले यांच्यात बोलाचाली नाही.किशोर दाभोलकर हे नेहमी सकाळी ते रहात असलेल्या साईसृष्टी सोसायटी ते जानवली साटमवाडी येथील गणेश मंदिरापर्यंत मॉर्निंग वॉकसाठी जातात.रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असता आपल्या विरोधात तक्रार केली याचा राग मनात धरून सुभाष भोसले हे दुचाकी घेऊन त्यांच्या मागोमाग गेले. तसेच जानवली साकेडी-फाट्यानजीक दुचाकीवरून खाली उतरून किशोर दाभोलकर यांच्याकडे रागाने पाहून ‘थांब तुला ठार मारतो’ असे बोलून बाजूस असलेल्या कुत्र्याच्या दिशेने आपल्या हातातील काळपट रंगाच्या पिस्तुलाने दोन गोळ्या झाडल्या, असेही या तक्रारीत म्हटले आहे.घटना घडल्यानंतर घाबरलेल्या किशोर दाभोलकर यांनी आपले काही नातेवाईक तसेच मित्रांना या घटनेबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्यासोबत कणकवली पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर बिल्डर सुभाष भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.किशोर दाभोलकर यांनी तक्रार नोंदविल्यावर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, उपनिरीक्षक धनंजय चव्हाण तसेच पथक तत्काळ जानवली येथील घटनास्थळी रवाना झाले. त्याठिकाणी त्यांनी गोळ्यांच्या पुंगळ्याचा शोध घेतला. मात्र, त्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे घटनास्थळापासून जवळ असलेल्या घरातील रहिवाशांना या घटनेबाबत त्यांनी विचारले. त्यावेळी सकाळी फटाक्यांसारखा आवाज आल्याचे काही रहिवाशांनी सांगितले. त्यानंतर पिस्तुलाची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी भोसले यांचे घर गाठले. यावेळी भोसले कामानिमित्त कोल्हापूर येथे गेले असल्याचे त्यांचे सुपुत्र कणकवली नगरपंचायतीचे आरोग्य सभापती विराज भोसले यांनी सांगितले. पोलिसांनी पिस्तुलाबाबत विचारणा केली असता ते सुभाष भोसले यांच्याकडे असते, असे त्यांनी सांगितले. तसेच पिस्तुलाचा परवाना आहे का? अशी विचारणा केली असता तो परवाना त्यांनी पोलिसांना दाखविला. त्यामुळे भोसले हे घरी आल्यावर त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात घेऊन या, असे विराज भोसले यांना सांगत पोलीस पथक माघारी परतले.पिस्तुलाची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करणारकिशोर दाभोलकर यांच्या तक्रारीवरून सुभाष भोसले यांच्याविरोधात गोळीबार प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल असला तरी त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार झाला आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन पुढील तपास करण्यात येईल. तसेच त्यांचे पिस्तूल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तेथील अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे पिस्तूल वापरण्याचा परवाना असला तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा अनावश्यक वापर करणे गैर आहे. त्यामुळे आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीनेही कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यात येईल असे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले.