शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

भराडीदेवीच्या दर्शनाला जनसागर लोटला

By admin | Updated: February 8, 2015 01:00 IST

लाखोंनी नवस फेडले : विनोद तावडे, दीपक केसरकर यांच्यासह राजकीय नेत्यांची हजेरी; आज मोडयात्रेने सांगता होणार

चौके : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीच्या यात्रोत्सवास शनिवारी थाटात प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांनी भराडीदेवीचे दर्शन घेऊन नवस फेडले. त्यामुळे संपूर्ण आंगणेवाडी परिसर भराडीदेवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार विजय सावंत यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भराडीदेवीच्या यात्रोत्सवाला हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले. महाप्रसाद खास आकर्षण आंगणेवाडीतील गृहिणींनी दिवसभर उपवास करून बनविलेल्या महाप्रसादाची ताटे रात्री साडेदहाच्या सुमारास मंदिरात आणून देवीला नैवेद्य दाखविल्यानंतर त्या प्रसादाचे वाटप आंगणेवाडी महिला भगिनी व कार्यकर्ते दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या ओव्हरब्रीजवरून करतात. हा प्रसाद मिळविण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. आज मोडयात्रेने सांगता दीड दिवस साजरा होणाऱ्या या यात्रोत्सवाची सांगता आज, रविवारी मोडयात्रेने होणार आहे. मोडयात्रेमध्ये खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि स्थानिक ग्रामस्थ दर्शन घेतात. त्यामुळे आज, रविवारी सायंकाळपर्यंत यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे दर्शन घेण्यासाठी यात्रोत्सवात पहाटे अडीच वाजल्यापासून दर्शनरांगा लागल्या होत्या. यात्रोत्सवात मालवणकडून येणाऱ्या भाविकांसाठी आणि कणकवलीकडून येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळ्या दर्शनरांगा लावण्यात आल्या होत्या. या रांगांमधून भाविकांनी भराडीदेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. नऊ रांगांतून दर्शन यात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे यासाठी यावर्षी नऊ ठिकाणांहून दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन होत होते. गतवर्षी दर्शनाच्या सहा रांगा होत्या. यावर्षी तीन रांगा वाढविण्यात आल्याने मोठ्या रांगा लागलेल्या दिसत नव्हत्या. मंदिराभोवती व मंदिरामध्ये क्लोज सर्किट कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले होते. राजकीय व्यक्ती व अती महनीय व्यक्तींसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. ४आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई व स्थानिक, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेने चोख व्यवस्था पार पाडल्याने यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. ४आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे नरेश आंगणे, मंगेश आंगणे, भास्कर आंगणे, आनंद आंगणे व इतर आंगणे कुटुंबीय येणाऱ्या भाविकांचे आणि महनीय व्यक्तींचे स्वागत करत होते.