सिंधुदुर्गनगरी : एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, वेतन आमच्या हक्काचे, आशा वर्कर्स युनियनचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्ग रोखून धरून जेलभरो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यावेळी सुमारे ३५० आशा वर्कर्सना ताब्यात घेण्यात आले.आशा व गटप्रवर्तक यांना देण्यात येणारे मानधन हे अत्यल्प आहे. त्यामुळे या मानधनात वाढ करण्यात यावी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करण्यात यावे, आशांना आरोग्य सेवेत कायम करावे, खासगीकरण बंद करावे या मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांच्याकडून अनेक वेळा मोर्चा, धरणे, जेलभरो आदी आंदोलने करण्यात आली.या आंदोलनांची दखल घेत आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात तिप्पट वाढ करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.मात्र, त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जात नाही. त्यामुळे मानधन वाढीचा शासन निर्णय निघत नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)शी संलग्न असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको करीत जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना धुरी, सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांच्यासह ४०० हून अधिक आशा कर्मचारी उपस्थित होत्या.आंदोलकांना समज देऊन सोडलेआपल्या विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली बुधवारी ओरोस फाटा येथे जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी ३५० आशा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्याअंतर्गत समज देऊन त्यांना सोडण्यात आले.महामार्गावर वाहनांच्या रांगाआपल्या न्याय मागण्यांसाठी आशा वर्कर्स युनियनने बुधवारी ओरोस फाटा येथे विविध गगनभेदी घोषणा देत रास्ता रोको केला. महामार्गावर आशा कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. तर त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या.
आशा वर्कर्सचे जेलभरो, महामार्ग रोखला : ३५0 आशा वर्कर्सना ताब्यात घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:48 IST
एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, वेतन आमच्या हक्काचे, आशा वर्कर्स युनियनचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस फाटा येथे महामार्ग रोखून धरून जेलभरो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यावेळी सुमारे ३५० आशा वर्कर्सना ताब्यात घेण्यात आले.
आशा वर्कर्सचे जेलभरो, महामार्ग रोखला : ३५0 आशा वर्कर्सना ताब्यात घेतले
ठळक मुद्देआशा वर्कर्सचे जेलभरो, महामार्ग रोखला ३५0 आशा वर्कर्सना ताब्यात घेतले