शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणमध्ये आता महाकबड्डी भरवणार : जाधव

By admin | Updated: February 10, 2015 23:51 IST

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : अजिंक्यपदावर चिपळूणने कोरले नाव तर मंडणगड संघ उपविजेता

शिरगाव : कोकणच्या लाल मातीतून पुढे आलेल्या कबड्डीने जगातील ३५ देशांत लोकप्रियता मिळवली, ४५ कोटी देशवासीयांनी प्रोकबड्डी क्रीडा स्पर्धा पाहिल्या आहेत. येत्या मे महिन्यापासून अधिकाधिक खेळाडूंना संधी मिळण्यासाठी महाकबड्डीचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा चिपळुणातील प्रोकबड्डी बक्षीस वितरणप्रसंगी १९८० अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी केली. मला आजही मैदानात खेळावे वाटले, असे संयोजन जिमखाना स्पोर्टस् क्लबने केल्याचे सांगून सचिन कदम क्रीडारसिकांच्या मनात १०० पावले पुढे गेल्याचे आपल्या भाषणातून सांगितले.अंतिम सामन्यात नम्रता प्रतिष्ठान, मंडणगडचा, चिपळूण संघाने तब्बल २१ गुणांनी पराभव केला. उपविजेता संघातून कुलभूषण कुलकर्णी, नितीन कुंभार, सौरभ तटकरे यांची अन्य स्पर्धेतील कामगिरी यावेळी दिसली नाही तर स्वप्नील शिंदे, सतीश खांबे, अभिषेक भोजने यांनी लक्षवेधी कामगिरी दाखवत संघाला यश मिळवून दिले. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या शाहू (सजेली) कोल्हापूर संघातील महेश मगदूम याने क्रीडा रसिकांकडून वाहवा मिळवली. संघाने मिळवलेला २६ गुणांपैकी आठ गुण त्याचे एकट्याचे होते. काही काळ आक्रमक झालेल्या कोल्हापूर संंघातील खेळाडूंना दोनवेळा ग्रीन व एकदा रेड कार्ड दाखवत पंचांनी सामन्यावर नियंत्रण ठेवले. भैरवनाथ पुणे संघाला या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळाला तर वैयक्तिक बक्षिसांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू चिपळूणचा अभिषेक भोजने, उत्कृष्ट पकड मंडणगडच्या कुलभूषण कुलकर्णी तर उत्कृष्ट चढाईचे बक्षीस कोल्हापूरच्या महेश मगदूमला देण्यात आले.१९३५ नंतर चिपळूणवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिलेली ही दुसरी कबड्डी स्पर्धा यशस्वी झाली आहे. क्रीडा प्रेमींना या क्रीडा संकुलात बसून योग्यप्रकारे खेळ पाहता आल्याचे समाधान आहे. यापुढील स्पर्धेला आपले सहकार्य राहील, असे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष रमेश कदम यांनी सांगितले. उरणच्या कलाकारांनी दोनवेळा नृत्याविष्कार सादर केल्याने मधल्या वेळेतही चैतन्य टिकवण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी पुणेरी फलटणचे कैलास कानपाल, आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, अर्जुन अ‍ॅवार्ड मानकरी व पुणेरी फलटणचे प्रशिक्षक अशोक शिंदे, सुधीर शिंदे, शेखर निकम, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, प्रताप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)