शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

..तर नगरपंचायत जिंकली असती

By admin | Updated: May 30, 2016 00:47 IST

शंकर कांबळी : कुवत नसलेल्यांना दिली उमेदवारी

कुडाळ नगरपंचायत जिंकली असती. ज्या उमेदवारांची कुवत नाही, अशा उमेदवारांचे नेतृत्व पक्षाने पाहिले नाही. त्यामुळेच कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला, असे यावेळी माजी आमदार शंकर कांबळी यांनी स्पष्ट केले. ते सालईवाडा येथील कार्यक्रमात बोलत होते.ते पुढे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये अधिपत्य स्थापन करायचे असेल, तर एकमुखाने, एकदिलाने काम करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी असली पाहिजे. तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ यांचे नेतृत्वगुण पाहता त्यांना आमदारकी लढविण्याची संधी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी केले.शिवसेनेतर्फे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर येथील गणेश हॉल-सालईवाडा येथे रविवारी पार पडले. शिबिराच्या प्रारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी कांबळी बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख राजू नाईक, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, एस.टी. कामगार सेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत कासार, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, एकनाथ गोसावी, श्रृतिका दळवी, रश्मी माळवंदे, नगरसेविका शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, शहरप्रमुख शब्बीर मणियार, युवा सेना तालुकाध्यक्ष सागर नाणोसकर, श्रेया परब, अशोक दळवी, सुवर्णा कोठावळे, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते. माजी आमदार कांबळी म्हणाले, सर्वांनीच पक्षाची उपेक्षा केली तर पक्षाचे नुकसान आहे. त्यामुळे मी करेन तेच खरे, असे केल्यास पक्षाला याचा हादरा बसू शकतो. अत्यंत सावधगिरीने पक्षाची बांधणी करून चांगले नेतृत्व करा, असा सल्ला कांबळी यांनी दिला. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, ज्यावेळी शिवसेना पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिकट परिस्थिती होती, त्यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुखाची जबाबदारी आपण हाती घेतली. त्यावेळी तालुक्यात काही ठिकाणी शाखाप्रमुख, विभागप्रमुख कार्यरत नव्हते. अशा ठिकाणी शैलेश परब व अन्य कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकारिणीची निवड केली व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. राजू नाईक म्हणाले, कुठलाही कार्यक्रम अथवा सभा घेताना आपल्या कार्यकर्त्यांना डावलू नका. मतभेद न करता सर्वांना सोबत घेऊन काम करा, असा संदेश दिला. तर उपशहर संघटक श्रृतिका दळवी, युवा सेना तालुकाध्यक्ष सागर नाणोसकर, समीर मामलेकर यांचेही यावेळी विशेष अभिनंदन केले. (वार्ताहर)कांबळींना विश्वास : नारायण राणे आमदार होणार नारायण राणे हे आता आमदार होणार हे निश्चित आहे. ते आता अजून ताकदीने काम करणार आहेत. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जोमाने काम करा, असे आवाहन शंकर कांबळी यांनी केले.