शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

हे वैभव पहायला शिवसेनाप्रमुख हवे होते

By admin | Updated: January 5, 2015 00:38 IST

दीपक सावंत : वळीवंडे येथे आरोग्यमंत्र्यांचा नागरी सत्कार

शिरगांव : माझ्या यशामध्ये माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे. पक्षप्रमुख व शिवसेनाप्रमुख ही आयुष्यातील मोठी दैवतं आहेत. त्यांची साथ आणि आशीर्वाद आयुष्यभर लाभला. त्यांचा जवळचा सहवास त्यांची सुश्रृषा करण्याचा योग आला. एकहाती ६३ आमदार निवडून आणले हे वैभव पहायला शिवसेनाप्रमुख हवे होते, असे भावोद्गार राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी वळीवंडे येथे काढले.वळीवंडे ग्रामस्थ ग्रामहितवर्धक मंडळाच्यावतीने डॉ. दीपक सावंत, अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार वळीवंडे येथे करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. दीपक सावंत म्हणाले, शिवसेना हे एक कुटुंब आहे. एकमेकांविषयी प्रेमभावना असलेल्या भावनिक नात्याने शिवसेना जोडली गेली आहे. त्यामुळे कोणीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता आहे हे मान्य आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा कितीतरी कमी खर्चात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण दिले जाते. करार पूर्ण झाल्यावर खासगी प्रॅक्टीस करण्याची स्पर्धा लागली आहे. ग्रामीण भागाकडे काम करण्याची त्यांची मानसिकता नाही. ही मानसिकता बदलायला हवी. डॉ. कोटणीस, डॉ. प्रकाश आमटे यांसारखे ग्रामीण भागात सेवा देणारे डॉक्टर्स निर्माण होणे गरजेचे आहे.पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, भाईसाहेब सावंत आरोग्य मंत्री असताना आरोग्य विभागाचा झपाट्याने विकास झाला. आता या आरोग्य यंत्रणेला डॉ. दीपक सावंत यांच्या रूपाने पालक मिळाले आहेत. ते टेलीमेडिसीनची संकल्पना आपल्या कृतीतून निश्चितच साकारतील. वळीवंडे गावच्या विकासासाठी २० लाखाचा निधी दिला जाईल. देवगड तालुक्याचा पाणी प्रश्न गंभीर असून येत्या दोन-तीन वर्षात यावर कायमची उपाययोजना केली जाईल. पर्यटनावर आधारीत विकास हा येथील ऐतिहासिक वारसा व वैभव जपून करण्यावर भर दिला जाईल. सर्वांच्या साक्षीने संपन्न व समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा घडवायचा आहे. जिल्हा नियोजन मंडळावर देवगड तालुक्याला भाजपाचे सदाशिव ओगले यांना संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.आ. नाईक म्हणाले, विकासाची दूरदृष्टी असलेले मंत्री जिल्ह्याला मिळाले. देवगड तालुक्यालाही राज्यात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली ही गौरवाची गोष्ट आहे. डॉ. दीपक सावंत यांनी विविध वैद्यकीय उपक्रम राबवून जन्मभूमीची सेवा केली आहे. योग्य माणसाकडे योग्य पद पक्षप्रमुखांनी सोपवले. या जिल्ह्याचा आता नियोजनबद्ध विकास होईल, यात शंका नाही.या नागरी सत्कार सोहळ््यात डॉ. दीपक सावंत, दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून वळीवंडे गावाच्यावतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनिला सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे, सरपंच विरेंद्र सावंत, तहसीलदार जीवन कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, तालुकाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव ओगले, पंचायत समिती सदस्य सदानंद देसाई, संतोष किंजवडेकर, माजी उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजु, वळीवंडे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाचे संस्थापक रामचंद्र सावंत, सचिव राजू सावंत, मुंबई अध्यक्ष केशव सावंत, डॉ. राऊत, कुणकेरीचे शशिकांत सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)