शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

‘स्पंदन तरुणाईचे’ महोत्सव ठरला यादगार

By admin | Updated: January 14, 2015 23:21 IST

जल्लोषाला उधाण : खर्डेकर महाविद्यालयात मराठमोळ्या लावण्यांचा आविष्कार

वेंगुर्ले : मराठमोळ्या लावणीचा ठेका, एकापेक्षा एक सरस नृत्याविष्कार, हिंंदी-मराठी गीतांचा मिलाप, टाळ्यांचा कडकडाट आणि ‘वन्स मोअर’ची साद यामुळे वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील ‘स्पंदन तरुणाईचे’ हा युवा महोत्सव यादगार ठरला. बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या संस्कृत पंडित शिक्षणमहर्षी स्व. एम. आर. देसाई रंगमंचावर युवा महोत्सवास प्रारंभ झाला. तेजस मेस्त्री याच्या सुमधूर ‘गणेश वंदना’ने गौरेश गोसावी याने सादर केलेल्या तांडव नृत्याने झकास सुरुवात करून दिली. तेजस मेस्त्री आणि जागृती पेठे यांनी ‘स्वर्ग हा नवा’ हे युगुल गीत गाऊन उपस्थितांना भावविश्वात नेऊन ठेवले, तर तनुजा घोरे, स्रेहल ठाकूर, आशिष कदम, प्रणव देऊलकर, अंकिता, रुचिता, पूजा रेडकर, अभिषेक गावडे यांनी सादर केलेल्या ‘हि-पॉप’ सोलो नृत्याने रसिकांची वाहवा मिळविली. कॉलेज जीवनातील पे्रेम विरहाने व्यसनाच्या आहारी गेलेल्या आणि प्रेमासाठी आयुष्यही पणाला लावलेल्या युवकांच्या प्रतिमा नृत्याद्वारे साकारणाऱ्या ‘उपाशी’ मित्रमंडळाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने व्यसनमुक्ती आणि ‘डोळस’ प्रेमाचा संदेश दिला. तर झेडएक्स ग्रुपने सादर केलेल्या विनोदी ढंगाच्या नृत्याने सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला. बॅ. खर्डेकरच्या शरीरसौष्ठवपटूंनी ‘वंदे मातरम’ ची सलामी देत आपल्या पिळदार शरीराचे दर्शन घडविले. दमादम मस्त कलंदर, पैसा फेक तमाशा देख या नृत्यांनी वन्स मोअर मिळविला. समृद्धी व अमृता पेडणेकर या भगिनींनी ‘गोऱ्या गोऱ्या गालावरी’ हे वेगळ्या धाटणीचे गीत सादर केले. तसेच ‘अंबे अंबे...’ या गीतावर सादर केलेली चित्तथरारक दृश्ये प्रेक्षकांना भावली. या कार्यक्रमाला महेंद्र मांजरेकर (की बोर्ड), महेश तळगावकर (आॅक्टोपॅड), नारायण मळगावकर (ढोलक), अमित रगजी (ढोलकी), आदित्य वालावलकर (तबला) यांनी संगीतसाथ दिली, तर निवेदन अक्षय वाटवे याने केले. या कार्यक्रमात नाट्य व साहित्य क्षेत्रातील दिग्गज प्रकाश इनामदार, जितेंद्र देशपांडे यांचा प्राचार्य विलास देऊलकर व प्रा. आनंद बांदेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रीतम सावंत, गुरुदास तिरोडकर, पूजा बोवलेकर, जागृती पेठे, कविता परब, श्रद्धा धुरी, यशवंत राऊळ, संकेत धुरी, अमेय नवार, सचिन गावडे, सेजल कांबळी, विपुल पवार, समृद्धी पेडणेकर, परेश आरोलकर, अनिकेत सांगवेकर, गिरिधा नार्वेकर, कांचन धर्णे, चारुशिला मोर्जे, सागर सतपाळ, स्रेहल ठाकूर, देवू धोंड, स्रेहल गावकर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभार प्रा. सचिन परूळकर यांनी मानले. (वार्ताहर)