शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ओसरगाव अंगणवाडीला ‘आयएसओ’

By admin | Updated: November 5, 2016 00:50 IST

शिरपेचात मानाचा तुरा : मानांकन मिळालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली स्मार्ट डिजिटल अंगणवाडी बनण्याचा मान मिळाल्यानंतर ओसरगाव कानसळी अंगणवाडीला ‘आयएसओ ९००१ : २०१५’ मानांकनही मिळाले आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळविणारी कानसळी ही जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी ठरली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, लवकरच मान्यवरांच्या हस्ते मानांकन प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डिजिटलच्या जमान्यात आता अंगणवाड्याही मागे राहिलेल्या नाहीत. सिंधुदुर्गातील २०० हून अधिक अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील ओसरगाव कानसळी अंगणवाडीने एक पाऊल पुढे टाकत लोकसहभागातून प्रथमत: स्मार्ट डिजिटल अंगणवाडी होण्याचा जिल्ह्यात पहिला मान मिळविला आहे. त्यानंतर ‘आयएसओ’ मानांकनही मिळविण्याचा पहिला मान मिळविला आहे. ओसरगाव-कानसळी अंगणवाडीचे पूर्वीचे रूप पूर्णपणे पालटून गेले असून, स्मार्ट डिजिटल अंगणवाडीमुळे अंगणवाडीमध्ये मुलांच्या येण्याचा ओढाही वाढला आहे. मराठी, इंग्रजीत मजकूर लिहिलेल्या बोलक्या भिंती, शब्द, अंक ओळख, थोर राष्ट्रपुरुषांचे फोटो, बसण्यासाठी खुर्ची, टेबल, शुद्ध पाणी, गणवेश, ओळखपत्र, जमिनीवर कारपेट, कार्टून्स, बगीचा, खेळणी या गोष्टी अंगणवाडीमध्ये पहावयास मिळतात. अशाप्रकारे बालवयातच शाळेची ओढ नव्हे, तर वेड लागले पाहिजे, अशा पद्धतीने अंगणवाडी बनविण्यात आली आहे. त्यामुळेच या अंगणवाडीची तपासणी अधिकारी प्रवीण लोंढे यांनी करत या अंगणवाडीची ‘आयएसओ’ साठी निवड केली होती. ही अंगणवाडी स्मार्ट, डिजिटल बनविण्यासाठी आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी ओसरगाव-कानसळी अंगणवाडी सेविका नंदा आळवे, मदतनीस सुप्रिया सावंत, मुख्य सेविका श्रद्धा दीपक माने यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच येथीलच श्री विठ्ठल रखुमाई विकास मंडळानेही आर्थिक मदत केल्याने लोकसहभागातून स्मार्ट डिजिटल अंगणवाडी होऊ शकली. तसेच महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सोमनाथ रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. लवकरच स्मार्ट डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन आणि आयएसओ मानांकन प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. (प्रतिनिधी)लोकसहभागातून रूपडे पालटलेअंगणवाडी (बालवाडी) म्हटले की, पूर्वी मंदिर, समाजमंदिर किंवा भाड्याच्या मोडकळीस आलेल्या खोल्यांमध्ये भरणारी शाळा असेच चित्र दिसत होते. मात्र, मागील काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या व स्थानिक लोकसहभागाच्या माध्यमातून अंगणवाड्यांचे रूपडे बदलू लागले आहे. अंगणवाड्यांचा कायापालट झाला आहे. लहान मुलांना गंमत गाण्यामधून शिकविता आले पाहिजे, यासाठी शासनस्तरावरही प्रयत्न होताना दिसून येत आहेत.