शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वळणावरची ती भिंत देतेय अपघाताला निमंत्रण

By admin | Updated: November 5, 2014 00:05 IST

संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब

देवरुख : मुंबई - गोवा महामार्गावरील अतिक्रमणांना धोबीघाट दाखवणाऱ्या बांधकाम विभागाने स्वत: बांधलेली संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब लावला आहे. ही भिंत अपघाताला कारणीभूत ठरत असून, बांधकाम विभागाने ती तातडीने हटवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. १७वर संगमेश्वरजवळ असलेले शासकीय विश्रामगृह १०० वर्षांचे झाले आहे. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमासमोरच विश्रामगृह आहे. येथे फार पूर्वी काळ्या दगडांचा वापर करून संरक्षक भिंंत उभारण्यात आली आहे. पूर्वी या महामार्गावरची वाहतूक मर्यादित होती. त्यावेळी या भिंतीचा अडसर जाणवला नाही. आता मात्र महामार्गावरची वाहतूक वाढल्याने या भिंतीचा मोठा त्रास दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या भिंतीलाच लागून धोकादायक आणि अरुंद वळण आहे. भिंत महामार्गाला टेकल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी बाजूपट्टीही शिल्लक राहिलेली नाही. संगमेश्वरकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नाही. रत्नागिरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनचालकांना समोरुन एखादे वाहन आल्यास आपल्या वाहनावर ताबा मिळवणे कठीण जाते. यामुळे आजवर अनेक अवजड वाहने थेट नदीत कोसळली आहेत. आजवर येथे झालेल्या अनेक अपघातात सहा जणांना प्राण गमवावे लागले असून, १५पेक्षा अधिक प्रवासी जायबंदी झाले आहेत. मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी वाहने शासकीय विश्रामगृहाजवळील या धोकादायक भिंंतीजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला ओढली जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांवर आपटूनही येथे अनेक अपघात घडले आहेत. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे पादचारी आणि वाहनचालकांनी ही भिंंत तातडीने हटविण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, या मागणीकडे लक्ष द्यायला बांधकाम विभागाला वेळ नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही भिंंत हटवायची नसेल तर नदीच्या बाजूने काँक्रीटची संरक्षक भिंंत उभारून वळण रुंद करणे शक्य असतानाही बांधकाम विभाग दोन्ही गोष्टींचा विचारच करत नसल्याने याठिकाणी घडणाऱ्या अपघातांचा धोका कायम राहिला आहे. (प्रतिनिधी)