शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

अवैध पोस्टर्स, बॅनर्स रविवारपर्यंत काढा

By admin | Updated: April 21, 2017 22:50 IST

अवैध पोस्टर्स, बॅनर्स रविवारपर्यंत काढा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील अवैध पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स, जाहिरातीचे फलक २३ एप्रिलपर्यंत संबंधितांनी काढावेत. अन्यथा २४ पासून अशांवर पोलिस व नगरपरिषद व पालिका प्रशासनाच्यावतीने संयुक्त धडक मोहीम राबवून अवैध पोस्टर्स, बॅनर्स व जाहिरात लावणाऱ्यांवर विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी आयोजित बैठकीत दिली. शहरांमध्ये लावल्या जाणाऱ्या पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्सवर कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या अध्यक्षतेखाली अधीक्षक कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस सर्व तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. नगरपालिका व नगरपरिषद हद्दीत राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व सामान्य नागरिक यापैकी ज्यांनी-ज्यांनी अवैध पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स, जाहिराती लावलेल्या आहेत, त्यांनी हे फलक २३ एप्रिल २०१७ पर्यंत काढावेत. २४ रोजी पोलिस प्रशासन व नगरपालिका, नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अवैधरित्या लावलेले फलक काढण्यात येणार आहेत. तसेच असे फलक लावणाऱ्यांवर विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई करणार असल्याचे अमोघ गावकर यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले. (प्रतिनिधी) परवानगी घेऊनच फलक लावावेत यापुढे नगरपालिका व नगरपरिषद हद्दीमध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व सामान्य नागरिक यांना पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स व जाहिरातीचे फलक उभारायचे झाल्यास स्थानिक नगरपालिका किंवा नगरपरिषद प्रशासनाकडून कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी स्पष्ट केले. ...तर छपाई करणाऱ्यांवरही कारवाई बॅनर्स, होर्डिंग्स, पोस्टर्स, जाहिरातींची छपाई करणाऱ्यांनी छपाई करण्यात आलेल्या व्यक्ती, किंवा संघटनांकडून रितसर परवानगी असल्याबाबत व बॅनर लावण्यात येण्याचा कालावधी याबाबत माहिती द्यावी व ती इतर मजकुरासोबत बॅनर्सवर छापावी, अन्यथा विद्रुपीकरण कायद्यान्वये त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिले आहेत.